मुंबई : टिल्ल्या लोकांनी हे मला सांगण्याची गरज नाही. त्यांची उंची आणि झेप किती, त्यांना मी कशाला उत्तर देऊ. माझे प्रवक्ते त्यांना उत्तर देतील. असल्या लोकांच्या नादी लागत नाही. असं म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नितेश राणे यांना टोला लगावला. त्यावर आता नितेश राणे यांनी अजित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
मै झुकेगा नहीं साला..! फडणवीस, शहा, अन् केसरकारांना टॅग करून राऊतांचं आवाहन
लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले. यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली व हे सिद्द झाले की यांना औरंग्यावरची टिका सहन होत नाही. म्हणूनच यांचे काका छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही. असं म्हणत नितेश राणे यांनी यावर भाष्य केलं आहे.
“माझ्या विधानावर ठाम, अगोदर बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना विचारा”; अजित पवार
त्याआधी आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे, हे केव्हाच सिद्ध झालं आहे. कारण त्यांनी तहआयुष्यात कधीही आमच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक केलं नाही किंवा रायगडाच्या दिशेने त्यांचे कधी पाय वळाले नाही. असं म्हणत नितेश राणे यांनी अजित पवारांनावर निशाणा साधला.
“फडणवीसांकडून जी 20 ची तुलना ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानासोबत”; राज्यात आणखी एक नवा वाद
दरम्यान, संभाजी महाराज यांचा माझ्या विधानातून कोणताही अपमान झाला नाही. याउलट भाजपच्या आमदारांनी, राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, आणि इतर महापुरूषांचा वारंवार अपमान केला आहे. त्यामुळे माझे विचार मी मांडले आहेत. माझ्याविरोधात जे आंदोलन करत आहेत. त्यांनी अगोदर बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना विचारावं, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली व हे सिद्ध झाले की यांना ‘औरंग्यावरची ‘ टिका सहन होत नाही म्हणूनच यांचे काका छत्रपती शिवाजी महारांजाच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही.@AjitPawarSpeaks
— nitesh rane (@NiteshNRane) January 5, 2023
Read also
- “तेव्हा मिर्झाराजे जयसिंगची भूमिका तीच आजच्या काळात औरंगजेबासोबत बावनकुळेंची”
- “इडीकडून अनिल परबांवर 10 कोटीची टाच, सगळ्यांना त्याची किमंत चुकवावी लागले”, अनिल परबांचा इशारा
- मोठी बातमी..! अनिल परबांवर इडीची मोठी कारवाई, तब्बल 10 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त
- “आव्हाडांचा मुंब्रारक्षक उल्लेख करत नितेश राणेंचं आव्हाडांना पत्र”, म्हणाले…
- “गाडीचा चक्काचुर, डोक्यावर गमजा, अन् अंगावर शाल, धंनजय मुंडे मुंबईकडे रवाना?”