मुंबई : राज्यात सध्या भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप, टिका टिप्पणी केली जात आहे. एकमेकांवर चिखल फेक करण्याची एकही संधी दोन्ही बाजूंनी सोडली जात नाहीय. यातच आता भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीवर शाब्दिक मारा करत जोरदार टोला हाणला आहे.
“तेव्हा मिर्झाराजे जयसिंगची भूमिका तीच आजच्या काळात औरंगजेबासोबत बावनकुळेंची”
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर वक्तव्य केलं. त्यानंतर राज्यात भाजपने आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबजी असा उल्लेख करत नवा वाद निर्माण केला. त्यावरून आता चंद्रशेखर बावनकुळेंवरदेखील राष्ट्रवादी टिका करताना दिसत आहे.
“इडीकडून अनिल परबांवर 10 कोटीची टाच, सगळ्यांना त्याची किमंत चुकवावी लागले”, अनिल परबांचा इशारा
यावरून आता शाहू, फुले, आंबेडकर, ऐवजी जहांगीर, औरंगजेब, बाबर म्हणणार बहुतेक राष्ट्रवादीवाले, असं म्हणत भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे.
मोठी बातमी..! अनिल परबांवर इडीची मोठी कारवाई, तब्बल 10 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त
दरम्यान, दुसरीकडे नितेश राणे यांच्या उल्लेख काल टिल्ल्या म्हणून अजित पवार यांनी केला. त्यावर देखील नितेश राणे यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. तर दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांमध्ये देखील शाब्दिक चकमक बघायला मिळत आहे.
आता शाहू, फुले, आंबेडकर
ऐवजी
जहांगीर, औरंगजेब, बाबर…
म्हणणार बहुतेक NCP वाले— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 4, 2023
Read also
- “सत्ताधारी पक्षांकडून गलिच्छ राजकारण, आता हे राजकारण थांबवावं,;” सुप्रिया सुळे
- “आता बावनकुळेंच्या जीं च्या फुली मारलेल्या फोटोला भाजप जोडो मारो आंदोलन करेल का ?”
- ठाकरेंची ताकद वाढतेय…! डोंबिवलीतील राष्ट्रवादीचे 11 पदाधिकांऱ्याचं शिवसेनेत प्रवेश
- “योगी महाराष्ट्रात येऊन उद्योगपतींशी चर्चा करतात, त्यावर राज ठाकरे गप्प का?”
- टिल्ल्या म्हणून डिवचल्यानंतर अजित पवारांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, “मला देवाने..;”