पुणे : देशात एव्हाना, महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक मंदी यामुळे विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षांना धारेवर धरलं आहे. अनेक ठिकाणी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलने करण्यात येत आहेत. तसेच विविध राजकीय नेते यावरून केंद्र सरकारवर कडाडून टिका करीत आहेत. यातच आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टिका केली आहे.
“तुम्हाला कसं काय जमतं बुवा ?” शितल म्हात्रेंचा सुषमा अंधारेंना खोचक टोला
रशिया-युक्रेन युद्ध, महागाई नियंत्रणासाठी जगभरातील केंद्रीय बॅंकांनी व्याजदरांत केलेली वाढ आणि जागतिक मंदीची भिती यामुळे जगभरातील चलने मागील वर्षभरात मोठ्या प्रमाणात घसरली आहेत. या वर्षभरात डॉलरच्या तुलनेत रूपया सुमारे 10 टक्क्यांनी घसरला आहे. ऑक्टोबर 2021 रोजी 1 डॉलरची किंमत 74 रूपये होती. ती आता 82 रूपये झाली आहे.
“….त्यात निरागसतेला ओढू नका हो..!”; शिवतीर्थावरील टिकेनंतर श्रीकांत शिंदेंच उद्धव ठाकरेंना पत्र
रूपयाच्या घसरगुंडीचा आयटी, कपडे आणि चहा उद्योगास लाभ होईल. आयातीवर अवलंबून असलेल्या एपएमसीजी, उर्जा, खनिज तेल व गॅस यांसारख्या क्षेत्रांना मात्र फटका बसत आहे. यांनाही फटका रूपया घसल्यामुळे हवाई वाहतुक व दुरसंचार क्षेत्रांना नफा घटला आहे. औषधी आणि स्टील यांच्यावर संमिश्र परिणाम झाला आहे. यावरून रूपया गिरता जा रहा है, मोदीजी को मजा आ रहा है, असं म्हणत रविकांत वरपे यांनी नरेंद्र मोदींना डिवचलं आहे.
Read also
- अखेर ठरलं..! ‘धनुष्यबाण गोठवलं तर ठाकरे ‘या’ चिन्हांवर लढवणार निवडणुक
- शिवसेना नेमकी कुणाची ? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? निवडणुक आयोगाचा निर्णय?
- “सुषमाताई..! आमच्यासारख्या जुन्या शिवसैनिकांना निष्ठा शिकवत असतील तर…”; शुंभुराज देसाई
- ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ म्हणणाऱ्या मोदींच्या रेल्वे मंत्रालयात चार लाख डॉलरची लाच ; राष्ट्रवादीचा आरोप
- दहा डोक्याचा नाही तर 50 खोक्यांचा खोकासुराचं शिवाजी पार्कवर दहन