मुंबई – सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपनं 11, तर महाविकास आघाडीनं 8 जागेवर विजय मिळवलाय. ह्या विजयानं मंत्री नारायण राणे याचं सिंधुदुर्गातील वर्चस्व पु्न्हा एकदा सिध्द झालं आहे. मात्र, या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून प्रमुख उमेदवार बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचा पराभव झाला आहे. तर, दुसरीकडं नारायण राणे गटाचे प्रमुख उमेदवार राजन तेली यांना महाविकास आघाडीचे उमेदवार सुशांत नाईक यांनी पराभवाचा धक्का दिलाय. तेलींच्या पराभवामुळं राणे गटाला जबर धक्का बसल्याचं पहायला मिळतंय. मात्र, असं जरी असली तरी सिंधुदुर्ग बँकेवर राणे गटानं निर्विवाद वर्चस्व मिळवलंय.
इतर वेळी खाडकन बोलणारे अजित पवार पहाटेच्या शपथविधीविषयी काहीच का बोलत नाहीत?
या निकालावर काॅंग्रेस नेत्यानं ट्विट करत भाजपवर निशाणा साधलाय. काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर कोकणी शैलीत जोरदार टीका केलीय. सावंत म्हणाले, शेलारानू.. अर्ध्या हळकुंडानं पिवळं कित्याक व्हतास? एक खुय जिल्हा बॅंक निवडणूक जिंकलास तरी, आमका काय फरक पडाचो नाय. तुमी कितीव हातपाय आपटलास तरी राज्याच्या सत्तेत आमीच आसव! पुढची 25 वर्सा महाविकास आघाडीची सत्ताच रवतली. तुमी वाट बगा. तुमच्या भ्रमाचो भोपळो भाजपाच्याच टाळक्यावर फुटतलो, असं त्यांनी कोकणी भाषेत शेलारांना चांगलंच डिवचलंय.
भाजप आमदार राज ठाकरेंच्या शिवतीर्थ’वर; भेटीमागचं नेमकं कारणं काय? वाचा सविस्तर…
भाजपच्या शेलारांनी ट्विट करत, देवांक सोडल्यानं अन् देवचराक धरल्यानं आणि विधान परिषदेत एक जागा गमवल्यान्ं…आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो, असं म्हणत महाविकास आघाडीला त्यांनी धारेवर धरलं होतं. नवी मुंबई, ठाणे, मुंबई महापालिका निवडणुकींच्या निकालाची ही नांदी असून अमितभाई शाह म्हंटल्याप्रमाणं हिम्मत असेल, तर तिघेही एकत्र समोर लढाईला या आम्ही तयार आहोत, असं खुलं आव्हान त्यांनी दिलं होतं. मात्र, शेलारांच्या ट्विटला काँग्रेसच्या सचिन सावंतांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलंय.
Read also:
- आमच्या कार्यकर्त्याला कोंडीत पकडल्यावर तो ‘म्याव-म्याव’ करत नाही तर ‘डरकाळी’ फोडतो – भाजप
- “..गमवल्यान्…आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो…”; आशिष शेलारांचं मालवणीतून ट्विट
- मुंबईत बसून हवेत गोळीबार करू नये; संजय राऊतांचा ठाकरे सरकारला घरचा आहेर
- कोरोनाने पुन्हा एकदा नेत्यांना घेरले आणि तेच ठरतायेत ‘सुपर स्प्रेडर ऑफ कोरोना’?
- आज मध्यरात्रीपासून राज्यात कठोर निर्बंध; ‘अशी’ असणार नवीन नियमावली