सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत झालेल्या राड्यानंतर अखेर जिल्हा बँकेवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. या विजयावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मालवणीतून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देवांक सोडल्यान अन् देवचराक धरल्यान आणि विधान परिषदेत एक जागा गमवल्यान्… आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो…, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.
“संतोष परब यांच्यावरील हल्ल्यामागे नितेश राणेच”; विनायक राऊतांचा आरोप
आशिष शेलार यांनी ट्विट करून ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देवांक सोडल्यान अन् देवचराक धरल्यान आणि विधान परिषदेत एक जागा गमवल्यान्…आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो… नवी मुंबई, ठाणे, मुंबई महापालिका निवडणुकींच्या निकालाची ही नांदी आहे. अमितभाई शाह म्हणाले त्याप्रमाणे हिम्मत असेल तर तिघेही एकत्र समोर लढाईला या. आम्ही तयार आहोत!, असं आव्हानच शेलार यांनी आघाडीला दिलं आहे.
देवांक सोडल्यान अन् देवचराक धरल्यान आणि
विधान परिषदेत एक जागा गमवल्यान्…आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो…नवी मुंबई, ठाणे, मुंबई महापालिका निवडणुकींच्या निकालाची ही नांदी आहे.
मा. अमितभाई शाह म्हणाले त्याप्रमाणे हिम्मत असेल तर तिघेही एकत्र समोर लढाईला या आम्ही तयार आहोत!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 31, 2021
“नारायण राणे सर्वांना पुरून उरणार आहेत”; चंद्रकांत पाटलांचा राणेंना पाठिंबा
दरम्यान, आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा निकाल लागला आहे. या 19 जागांपैकी 11 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला 8 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपचे राजन तेली आणि महाविकास आघाडीचे सतीश सावंत हे दिग्गज नेते पराभूत झाले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाची अवस्था गड आला, पण सिंह गेला अशी झाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आणि बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. तर भाजपचे विठ्ठल देसाई विजयी झाले आहेत. या ठिकाणी दोघांनाही समसमान मते मिळाली होती. त्यामुळे चिठ्ठीद्वारे झालेल्या प्रक्रियेत त्याठिकाणी देसाई यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पराभव झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.
Read also:
- मुंबईत बसून हवेत गोळीबार करू नये; संजय राऊतांचा ठाकरे सरकारला घरचा आहेर
- कोरोनाने पुन्हा एकदा नेत्यांना घेरले आणि तेच ठरतायेत ‘सुपर स्प्रेडर ऑफ कोरोना’?
- आज मध्यरात्रीपासून राज्यात कठोर निर्बंध; ‘अशी’ असणार नवीन नियमावली
- महाविकास आघाडीला मोठा धक्का; सतीश सावंत पराभूत..!
- ‘रिमोट कंट्रोल’ने फोन केला आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली