मुंबई : राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कडक निर्बंध लावण्याचे आदेश दिले आहेत. आजच्या मध्यरात्रीपासून हे निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.
तिसरी लाट भयानक रूपात येऊ शकते, कृपा करून निर्बंध पाळा; महापौर पेडणेकरांचे नागरिकांना आव्हान
कार्यक्रमांसाठी एकत्र येणाऱ्या लोकांची संख्या आता ५० करण्यात आली आहे. ५०च्या वर जर लोकं एखाद्या कार्यक्रमाला जमा झाले तर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. अंत्यविधीसाठी फक्त २० लोकांचं बंधन घालण्यात आलं आहे. चौपाट्या, पर्यटन क्षेत्रे येथे गर्दी टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास स्थानिक प्रशासनाने चौपाट्या, समुद्रकिनारे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मोठी बातमी: नितेश राणे यांना धक्का, अटकपुर्व जामीन न्यायालयाने फेटाळला
सध्या काही मोजक्याच गोष्टींवर निर्बंध घातले गेले आहेत. सध्या जरी कमी निर्बंध लावले असते तरीसुद्धा या निर्बंधांमध्ये वाढ करण्याचा विचार राज्य सरकार गांभीर्याने करत आहे. यासंदर्भात गुरुवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यामध्ये शाळा, कॉलेज, मॉल्स, चित्रपटगृह यांच्यावरील संभाव्य निर्बंधांवर देखील खल झाला. तसेच, गंभीर परिस्थिती उद्भवल्यास लॉकडाऊनच्या पर्यायावर देखील चर्चा झाली.
शाळा बंद करण्यावरही चर्चा ?
अवघ्या काही दिवसांपूर्वीच राज्यात जवळपास दीड वर्षांनंतर शाळा पूर्ववत सुरु झाल्या होत्या. मात्र कोरोनाची वाढती संख्या पाहता आता शाळा बंद करण्याबाबतही चर्चा बैठकीत झाली आहे. लगेचच शाळा बंद करू नये असा सूर या बैठकीतला होता मात्र तरीही जर कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आली नाही तर मात्र शाळा बंद होतील अशी चर्चा बैठकीत झाली आहे.
Read also:
- महाविकास आघाडीला मोठा धक्का; सतीश सावंत पराभूत..!
- ‘रिमोट कंट्रोल’ने फोन केला आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली!
- हुर्ररररर… हवेतच; बैलगाडा शर्यत सुरू करण्याला पुन्हा ब्रेक?
- कोल्हापुरातील अदानी-अंबानी जोडगोळीपासून सावधान राहा; खासदार मंडलिकांची मुश्रीफ, बंटी पाटलांवर नाव न घेता टीका
- “सरकारमधून बाहेर पडून भाजपसोबत सत्तास्थापनेसाठी चढाओढ”; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट