मुंबई : दिल्लीतील निर्भया सारखीच संतापजनक आणि लाजिरवाणी अशी घटना मुंबईतील साकीनाका मध्ये घडली आहे. अमानुष अत्याचाराला सामोरे जावं लागलेल्या पीडितेवर, घटनेनंतर तीन दिवस मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात पीडितेवर उपचार सुरू होते. अतिरक्तस्त्रावामुळे तिची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. मात्र आज अखेर मृत्यूशी सुरु असलेली तिची झुंज अपयशी ठरली असून तिचा दुर्दैवी अंत झाला आहे.
दरम्यान, यावरून आता विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले असून, या प्रकरणाची आता मुख्यमंत्री यांनी गंभीर दखल घेतली आहे. ‘साकीनाका परिसरात झालेली घटना दुर्दैवी असून, माणुसकीला काळिमा फासणारे हे कृत्य आहे. गुन्हेगारांना कठोर शिक्षा केली जाईल, यासंदर्भात मी गृहमंत्र्यांशी बोललो आहे,’ असं ते म्हणाले. तसेच, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत, तर कोर्टाने आरोपी मोहन चौहानला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा – नवाब मलिक
साकीनाका परिसरात ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना 10 सप्टेंबरला समोर आली. यात आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचं संतापजनक आणि अमानुष कृत्य केलं. या घटनेमुळे स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जातोय. मुंबईतील घटना ही गुरुवारी मध्यरात्री (9 सप्टेंबरला) घडली. या घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
‘महिला आणि बालविकासमंत्री असा विचार करतात, याची मला लाज वाटली!’
दुसरीकडे, भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी या घटनेवरून राज्य सरकारला जाब विचारला असून, ‘आम्ही आवाज उठवला तर तुम्ही राजकारण करतो म्हणता? तुम्ही शक्ती कायद्याचं काय केलं? अट्रोसिटीचं काय केलं? सरकारची अपेक्षा काय आहे? थोड्या तरी लाजा वाटू द्या. तुमच्या जाहिरनाम्यात पहिला मुद्दा होता महिलांची सुरक्षा, कुठे आहे शक्ती कायदा?” असा सवाल विचारत “हे सरकार आधीपासून बलात्काऱ्यांना राजाश्रय देत आहे. त्यामुळे, विकृतांचं मनोबल वाढत आहे,” असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे.
Read Also :
- ‘त्या’ दुर्दैवी घटनेचं राजकारण, म्हणजे मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार’
- महाविकास आघाडी सरकार स्थिर की अस्थिर? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
- ‘महाराष्ट्रातल्या महिलांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका!’ चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया
- धनंजय मुंडे, करुणा शर्मांचे फोटो टाकून FB वर बदनामीकारक पोस्ट; फडणवीस, पवारांबद्दल अश्लिल ‘मजकूर’
- ‘बाप्पाने राज्य सरकारला हीच बुद्धी द्यावी की…’, फडणवीसांचे गणरायाला साकडे