नाशिक : खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी येत्या १६ जून रोजी मोर्चा काढणार आहेत. काल (रविवारी) त्यांनी रायगडावरून मोर्चाची घोषणा केली आहे. तर, भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मराठा आरक्षण मोर्चा पुढे ढकलण्याचं आवाहन केलं आहे. या संदर्भात विखे-पाटील लवकरच संभाजी छत्रपती यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.
भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिकमध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला भाजपचे सर्व मराठा समाजातील आमदार, खासदार तसेच नगरसेवक देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर मीडियाशी संवाद साधताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी हे आवाहन केलं. येत्या दोन दिवसात संभाजी छत्रपती यांच्याशी चर्चा करून सर्व मराठा संघटनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच संभाजीराजेंनी १६ तारखेच आंदोलन पुढे ढकलण्याची विनंतीही त्यांना भेटून करणार असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितलं.
येत्या दोन दिवसात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आणि खासदार संभाजी छत्रपती यांच्यासह मराठा समाजातील सर्व संघटना आणि नेत्यांना एकत्रित बोलावण्यात येणार आहे. नेते आणि सर्व संघटनांमध्ये समन्वय साधण्यासाठी या सर्वांना एकत्र आणणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
Read Also :
- पंतप्रधानांना भेटण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हातात असणारे निर्णय घ्यायला पाहिजे होते
- सरकार काही जात नाही, फडणवीस तुम्ही सरकार पडण्याची वाटच बघा – एकनाथ खडसे
- नाथाभाऊंनी तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं; खडसेच्या टिकेला चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर
- मोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी पंतप्रधान मोदींना भेटणार
- .‘कोविडला निमंत्रण देणारी गर्दी चालणार नाही”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे