मुंबई : सीडीआर हा गुन्हेगारांचा मागवला जातो. पण समीर वानखेडे यांनी माझ्या मुलीचा सीडीआर पोलिसांकडे मागितला. सीडीआर मागवायला माझी मुलगी गुन्हेगार आहे काय?, असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना हा प्रश्न उपस्थित केला आहे.
एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा; भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मलिक म्हणाले, आम्ही कुणाच्याही खाजगी आयुष्याच्या अधिकाराचा भंग केला नाही. एखादा व्यक्ती धर्मांतर करून दुहेरी लाभ घेत असेल तर त्याचा उल्लेख केला पाहिजे. सत्य समोर आणण्यासाठी काही गोष्टी बाहेर येत आहेत. कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर आम्ही घाला घालत नाही. माझ्या जावयाला बंद केलं गेलं. कोर्टात प्रकरण आहे. माझी मुलगी अनेक कागदपत्रं काढण्याचा प्रयत्न करत आहे. समीर वानखेडेंनी मुंबई पोलिसांना पत्रं लिहून माझ्या मुलीचा सीडीआर मागितला. माझी मुलगी निलोफर मलिक काय गुन्हेगार आहे का? कोणत्या आधारावर माझ्या मुलीच्या खाजगी आयुष्याची माहिती मागितली आहे.? असा सवाल करतानाच वानखेडे आपल्या मर्यादेचा भंग करत आहेत.
महापालिका रणधुमाळी २०२२: विद्यमान नगसेवकांना प्रभाग रचनेचा धसका; सोईस्कर प्रभागासाठी रस्सीखेच
पुढे बोलताना ते म्हणाले, गुन्हेगाराचा सीडीआर हवा असेल तर तो मागा. तुमचा अधिकार आहे. हिंमत असेल तर माझ्या मुलीचा सीडीआर मागाच. त्यातही कायदेशीर लढाई आम्ही लढू. समीर वानखेडे दोन लोकांचे फोन टेप करत आहेत. लोकांच्या फोनला इंटरसेप्ट करत आहे. दोन प्रायव्हेट लोक आहेत. एक व्यक्ती मुंबईत आहे. दुसरा व्यक्ती ठाण्यात आहे. आज नाही तर उद्याही या शहरात वानखेडे लोकांचे कशापद्धतीने फोन टॅपिंग करत आहेत हे सुद्धा लोकांसमोर ठेवलं जाणार आहे.
Read Also :
- पुणे महापालिकेत लोकसंख्येनिहाय नगरसेवकांची संख्या ठरणार? 166 ऐवजी 183 उमेदवार असणार!
- समीर वानखेडे लोकांच्या घरात ड्रग्स प्लांट करतो; NCB अधिकाऱ्याचं खळबळजनक निनावी पत्र
- बायको-सासुबरोबर जेलमध्ये जायचं का? प्रकाश आंबेडकरांची अशोक चव्हाणांना धमकी
- महापालिका रणधुमाळी २०२२: विद्यमान नगसेवकांना प्रभाग रचनेचा धसका; सोईस्कर प्रभागासाठी रस्सीखेच
- शिवसेनेते असताना मी पक्ष मोठा केला, तेव्हा संजय राऊत खासदारही नव्हते; भुजबळांचा पटलवार