नागपूर : नागपूरचे माजी महापौर आणि भाजप नेते संदीप जोशी सध्या आपल्या ट्विटमुळे चर्चेत आले आहेत. वंजारीनगरला जोडण्यात येणाऱ्या नव्या पुलाच्या बांधकामावर आक्षेप नोंदवला. या पुलाच्या बांधकामावर आक्षेप घेत त्यांनी एनएचएआयवर ट्विटमधून निशाणा साधल्याने संदीप जोशी चर्चेत आले आहेत.
ट्विट करत एनएचएआयवर संदीप जोशींनी निशाणा साधला खरा. मात्र नंतर त्यांना यासाठी माफी मागावी लागली. हे खाते केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या अखत्यारित येते. त्यामुळे जोशींनी एकप्रकारे गडकरींवरच निशाणा साधल्याची चर्चा होती. मात्र आपली चूक लक्षात येताच त्यांनी माफी मागितली.
I m really sorry for the wrong information… it’s not NHI who constructed wanjari nagar bridge it’s PWD… So PWD officials shame on you …. @PWD_Maharahstra https://t.co/u9qKzceiU8
— Sandip Joshi (@SandipJoshiNGP) January 20, 2021
आपल्या ट्विटमध्ये चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागत वंजारीनगरचा पूल राष्ट्रीय प्राधिकरणाने बांधला नसून सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी सार्वजिनक बांधकाम विभागालासुद्धा पुलाच्या बांधकामावरुन निशाणा साधला.
Read Also :
- अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष बाइडन यांना पंतप्रधान मोदींनी दिल्या खास शुभेच्छा
- मराठा आरक्षणाबाबत समन्वयाचा अभाव ? सरकारला अंधारात ठेवून MPSCची न्यायालयात याचिका
- निलेश राणेंवर भाजपने सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी
- ‘चंद्रकांत पाटलांना कोल्हापुरातूनही निवडून आणू’
- … म्हणून अभिजीत बिचुकले थेट ठाकरे सरकारविरोधात करणार आंदोलन