वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डेमोक्रेकिट पक्षाच्या जो बाइडन यांनी आज शपथ घेतली. तर कमला हॅरिस यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. हा अमेरिकेचा दिवस आहे. हा लोकशाहीचा दिवस, असल्याचे यावेळी बाइडन म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवानंतर आता बाइडन पर्व अमेरिकेत सुरू होणार आहे. जो बाइडन यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर जगभरातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहे. भारतातूनही त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहे.
My warmest congratulations to @JoeBiden on his assumption of office as President of the United States of America. I look forward to working with him to strengthen India-US strategic partnership.
— Narendra Modi (@narendramodi) January 20, 2021
अमेरिकेच्या राष्ट्रपती म्हणून पद ग्रहण केलेल्या बायडन यांचं हार्दिक अभिनंदन. मी भारत आणि अमेरिकेच्या रणनितीक भागीदारी मजबूत करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास इच्छुक आहे, असे ट्विट करत पंतप्रधान मोदींनी बाइडन यांचे अभिनंदन केले आहे.
Congratulating the USA on a new chapter of their democracy.
Best wishes to President Biden and Vice-President Harris.#InaugurationDay
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 20, 2021
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी देखील ट्विट करत अमेरिकेच्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींचे अभिनंदन केले. लोकशाहीत एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे, यासाठी अमेरिकेचं अभिनंदन. राष्ट्रपती बायडन आणि उपराष्ट्रपती हॅरिस यांना खूप शुभेच्छा, असे ट्विट त्यांनी केले.
Read Also :
- मराठा आरक्षणाबाबत समन्वयाचा अभाव ? सरकारला अंधारात ठेवून MPSCची न्यायालयात याचिका
- निलेश राणेंवर भाजपने सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी
- ‘चंद्रकांत पाटलांना कोल्हापुरातूनही निवडून आणू’
- … म्हणून अभिजीत बिचुकले थेट ठाकरे सरकारविरोधात करणार आंदोलन
- कोरोना काळात दाखल करण्यात आलेले ‘ते’ गुन्हे मागे घेणार, गृहमंत्र्यांची माहिती