अलिबाग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या अनेक आमदारांची राष्ट्रवादीच्या सत्तेत सामील झाल्यामुळे हिरमोड झाली. यामध्ये पहिल्यापासून शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांचे नाव चर्चेत आले होते. यातच मंत्रिमंडळात मंत्रिपदापासून वंचित का राहिलो आहे. याचा किस्सा त्यांनी अलिबाग तालुक्यातील खानाव येथे काॅंग्रेस नेते अनंत गोंधळी यांचा शिंदे गटात प्रवेश कार्यक्रम झाला. यावेळी ऐकवला.
हेही वाचा…“मोदींची स्थिती देवेंद्र फडणवीसांच्या मी पुन्हा येईन सारखी होईल”, शरद पवारांचा खोचक टोला
मंत्रिमंडळ विस्तारात माझाच पहिला क्रमांक होता, परंतु ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत आले होते, त्यावेळी मी माघार घेतली. एकाने सांगितले की माझा बायको आत्महत्या करेन. दुसऱ्याने सांगितले नारायण राणे मला संपवून टाकेल. त्या दोघांना मंत्रिपद मिळाले. तिसरा म्हणला मला मंत्रिपद मिळाले नाही तर मी राजीनामा देतो. मी एकाला फोन केला, अरे तुमच्या संभाजीनगरमध्ये पाचपैकी दोघांना दिली. तुला काय घाई आहे, असे सांगून थांबलो तो अजूनपर्यंत थांबलो, असं भरत गोगावले म्हणाले.
हेही वाचा…कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, विरोधकांची टिका, अजित पवार भेट, शरद पवारांनी मांडली आपली भूमिका
दरम्यान, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात तरी मंत्रिपद मिळेल, या आशेवर असलेले शिंदे गटातील आमदार यामुळे नाराज झालेत. यातच आता उरर्वित मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“फडणवीस, बावनकुळेंच्या भाजपच्या 2 वरिष्ठांसोबत तब्बल 7 तास चर्चा, फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना”
हेही वाचा…काॅंग्रेसचा लोकसभा निवडणुकीचा प्लॅन ठरला, ३ सप्टेंबरपासून कामाला लागणार
हेही वाचा…“पवारांनी ‘घमंडीया‘ ची मोट बांधण्याचा प्रयत्न केला, तरीही २०२४ मध्ये जनता मोदींना साथ देणार”
हेही वाचा…“भाजपाला सत्तेतून उखडून टाकून काँग्रेसची सत्ता आणणे हाच काँग्रेसचा प्लॅन”
हेही वाचा…“शिरूर मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा,” ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी