पुणे : पुण्यातील 1 ली ते 7 वीचे वर्ग येत्या गुरुवारपासून सुरू होणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पुण्यात 16 डिसेंबरपासून शाळा सुरु होणार आहेत. ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरियंटमुळे राज्यातील शाळांना पुन्हा कुलूप लागणार का? अशी परिस्थीती होती, परंतु राज्य सरकारने यावेळी सावध पावलं टाकण्याचा निर्णय घेतला आणि स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्याची परवानगी दिली. त्या अनुशंगाने नाशिक, मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरात शाळा वेळेवर सुरु झाल्या नाहीत.
“ममता बॅनर्जी असो की राहुल गांधी सर्वांना फक्त शरद पवारच एकत्र आणू शकतात”
राज्यातील प्राथमिक शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला होता, मात्र, ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता पुणे महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून 16 डिसेंबरपर्यंत पहिली ते सातवीचे वर्ग बंदच ठेवण्याचा निर्णय घेताला होता.
पुण्याबरोबरच मुंबईतील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग उद्यापासून सुरु करण्याचे निर्देश पालिकेने मुख्याध्यापकांना दिले आहेत. पालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी मुंबईतील शाळा उद्यापासूनच सुरु होणार असून शाळेबाबत कुठलाही संभ्रम पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी बाळगू नये, असं स्पष्ट केलं आहे.
Read Also :
- काँग्रेसची नाचक्की..! काँग्रेसचे उमेदवारला मिळाले केवळ एकच मत..
- “त्यांच्या बापाशी लढून मी त्या पक्षामधून बाहेर पडलो. हे त्यांनी विसरू नये”
- भाजपच्या 12 आमदारांना सुप्रीम कोर्टाचा झटका, अधिवेशनालाही हजर राहता येणार नाही
- विलास लांडे पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर आमदार होणार.!
- मी स्वत: निवडून आलो त्यापेक्षा जास्त आनंद बावनकुळेंच्या विजयाने; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया