मुंबई : सध्या शिवसेनेच्या निवडणुक चिन्हावरून म्हणजे धनुष्यबाणावरून ठाकरे आणि शिंदे गटात रस्सीखेस सुरू आहे. पुढच्या आठवड्यात पितृपक्ष सुरू होत आहे. या काळात शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे खाली येतील अन् त्यामुळे धनुष्यबाण आम्हीच जिंकू असा दावा माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. त्यावर आता मनसेच्या नेत्या शालीनी ठाकरे यांनी खोचक टोला लगावला आहे.
“भट्टीतील कोळसा सावंतांनी कुंभकर्णी झोपेत असलेल्या स्वत: च्या नेतृत्वाला जागे करण्याची गरज”
उद्धव ठाकरे यांच्या अकार्यक्षम नेतृत्वाविषयी एकनाथ शिंदे यांनाच नव्हे तर किशोरी पेडणेकर यांनाही खात्री आहे. आजही बाळासाहेबच सर्व काही करणार असतील तर मग बाळासाहेबांच्या विचारांचे नाहीच. पण प्रॉपर्टीचे वारसदार असलेले स्वत: नक्की काय करणार ? शिवसैनिकांच्या हातांवर घड्याळ बांधणार का ? असा सवाल देखील मनसेच्या नेत्या शालीनी ठाकरे यांनी केला आहे.
“जसा भाजीपाला विकत घेतला जातो, तसा भाजप आमदार विकत घेताहेत”
धनुष्यबाण हे शिवसेनेचे निवडणुक चिन्ह आमच्याकडेच राहील. गाय वासरू नका विसरू हे काॅंग्रेसचं निवडणुक चिन्ह होतं. ते गोठवल्यानंतर हात सबका विकास सबका साथ निवडणुक चिन्ह मिळालं. त्यानंतर झालेली पहिली निवडणुक काॅंग्रेस जिकंली होती. त्यामुळे आमचाही विजय होईल अशी खात्री आहे. पण समजा नाहीच मिळालं धनुष्यबाण तरी सुद्धा चिन्ह मिळेल ते चिन्ह घराघरात पोहोचवून आम्ही जिंकू , हा विश्वास शिवसैनिक, मतदार आणि शिवसेना पक्षप्रमुखांना आहे असंही त्या म्हणाल्या होत्या.
“नवनीत राणा ह्या भाजप अन् पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अंधभक्त”
दरम्यान, अलिकडचे शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली. यावेळी शिंदे गटातील वकिलांनी धनुष्यबाण गोठवण्याची मागणी केली. त्यावर मात्र अद्यापही कोणताही निर्णय देण्यात आला नाही. परंतु पुढची सुनावणी आता 28 सप्टेंबर रोजी होणार आहे.
Read also
- “प्रत्येकाला बारामती मतदारसंघ हवासा वाटणे, यात काही गैर नाही”; सुप्रिया सुळे
- “तेव्हा उद्धव ठाकरे अन् आघाडी सरकार झोपा काढत होते का ?” मनसेचा सवाल
- “तेव्हा याकुब मेमनची कबर सजवत बसले अन् आता म्हणे माझ्या बापाच्या नावाने मतं मागू नका”
- वरळीत घेरण्याचा भाजपचा प्रयत्न, आदित्य ठाकरे म्हणाले, “फुटबॉलच्या मैदानात नेहमी रोनाल्डाच घेरण्याचा प्रयत्न केला जातो”
- याकुब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरणावरून नवा वाद; अजित पवारांना प्रश्न विचारताच म्हणाले, “तु मुख्यमंत्री असता तर..;”