IMPIMP

अहमदनगर जिल्हा बँकेवरून पवार-फडणवीस निवडणुकीच्या रिंगणात 

अमहदनगर : जिल्हा सहकारी बँक निवडणुकीला यंदा पहिल्यांदाच राजकीय रंग चढला आहे. राज्याप्रमाणेच या निवडणुकीतही भाजप विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये सामना रंगताना पाहायला मिळत आहे. त्यातच माजी आमदार शिवाजी कर्डीले हे स्वत: या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कर्डीले यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी नगर तालुक्यातील 109 पैकी 100 मतदार आपल्यासोबत असल्याचा दावा कर्डीले यांनी केला आहे. दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. तर रविवारी शरद पवार नगरच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागलं आहे.

अहमदनगर जिल्हा बँकेतील संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी आहे. तर 20 फेब्रुवारीला मतदान पार पडेल. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, खासदार आणि अन्य लोकप्रतिनिधींनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान बँकेच्या निवडणुकीत दरवेळी विखे-पाटील विरुद्ध थोरात असं चित्र पाहायला मिळत. पण यावेळी पवार आणि फडणवीसांमधील संघर्षही जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पाहायला मिळू शकते.

साखर कारखानदारांची असलेली जिल्हा बँक आपण शेतकऱ्यांची बनवली. शेतकऱ्यांना 140 कोटी रुपयांचं वाटप केलं. गेल्या 10 वर्षांपासून आपण बिनविरोध निवडून येत आहोत. यंदाही आपल्याविरोधात उमेदवार देण्यासाठी विरोधकांना शोध घ्यावा लागेल, अशी म्हणज माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर विरोधकांवर टीका केली.

यंदा भाजपने पक्षीय पातळीवर ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. भाजपकडून ही निवडणूक विखे-पाटील यांच्या नेतृत्वातच होणार आहे. पण आता भाजपमध्ये असलेल्या अनेकांनी यापूर्वी थोरातांसोबत बँकेची निवडणूक लढवली होती. तसंच विधानसभा निवडणुकीनंतर विखेंविरोधात तक्रार केलेले अनेक नेतेच बँकेशी संबंधित आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर या नेत्यांची मोट बांधणं कठीण असल्यानं फडणवीसांना यात लक्ष घालणं गरजेचं ठरलं आहे. दरम्यान, जिल्हा बँक निवडणुकीसाठी राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री राम शिंदे आणि माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्या नेतृत्वात एक समिती गठीत करण्यात आली आहे. तर फडणवीस यात स्वत: लक्ष घालणार आहेत.

Read Also

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत सुशीलकुमार शिंदे आघाडीवर?

‘मुख्यमंत्री होण्याची मला कोणतीही घाई नाही’