पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसांचा पिंपरी चिंचवड दौरा करणार आहेत. शनिवारी राष्ट्रवादीच्या आजी-माजी नगरसेवकांची बैठक होणार असून रविवारी मेळावा घेण्यात येणार आहे. खुद्द शरद पवार यांच्याकडून पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत तोंडघशी पडलेल्या शिवसेनेची पुण्यात मोर्चेबांधणी; संजय राऊतांच्या जोर बैठका
आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शहरात लक्ष घातल्याचे दिसत आहे. येत्या शनिवारी आणि रविवारी शरद पवार दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. शनिवारी आजी-माजी नगरसेवकांची बैठक, तर रविवारी कार्यकर्ता मेळावा होणार आहे. आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शरद पवार शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस शहराचा दौरा करतील. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात सरकारी योजनेचा नागरिकांना लाभ देण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन करणार आहेत.
त्यानंतर निगडी, यमुनानगर येथील बॅक्वेट हॉल येथे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. तर, रविवारी दुपारी साडेतीन वाजता रहाटणीतील थोपटे लॉन्स येथे कार्यकर्ता मेळावा होणार आहे. यावेळी शरद पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे हे उपस्थित असणार आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
Read Also :
- पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीत२५० कोटींचा घोटाळा; भाजपच्या आक्षेपानंतर धक्कादायक प्रकार उघड
- निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान; संभाजी भिडेच्या वक्तव्याने राज्यात खळबळ
- तुम्ही चारवेळा मुख्यमंत्री होते, पण माझ्यासारखं सलग पाच वर्ष राहता आले नाही; फडणवीसांचा पलटवार
- वेळ देऊनही सरकारनं आश्वासन पाळलं नाही; 25 ऑक्टोबरपासून संभाजीराजे पुन्हा राज्यभर दौरा करणार
- रेकॉर्डवर पवारांची एवढी प्रॉपर्टी तर बेनामी किती असेल? किरीट सोमय्याचा सवाल