नागपूर : आगामी लोकसभा, विधानसभा आणि महानगरापालिका डोळ्यासमोर ठेऊन अनेक राजकीय पक्षांनी काम सुरू केले आहे. राज्यात भाजपसह राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि शिवसेनेतील नेत्यांनी कामाला सुरूवात करून दिली आहेत. यातच आता एकमेकांवर टिका टिप्पणी करण्याची एकही संधी कुणी सोडत नाही. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर शाब्दिक टोला हाणला आहे.
हेही वाचा…अमित शाह काॅंग्रेसच्या बालेकिल्ल्यात, नांदेडमध्ये जाहीर सभा, काहीही होणार नाही, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
फडणवीस म्हणाले की, “निवडणुका जवळ आल्या की, पवार साहेबांचे स्टेटमेंट सुरू होतात. कोणीही इंटरनेटवर जाऊन तपासा किंवा जुने पेपर तपासा. २०१४ च्या निवडणुकीपुर्वी पवारसाहेब जे बोलले होते, तेच २०१९ च्या निवडणुकीआधीच्या प्रचारावेळी बोलले होते. तीच वाक्य विधानसभा निवडणुकीच्या आधी बोलले.”
हेही वाचा…संजय राऊतांनी ती चूक टाळली, अजित पवारांचं बोलणं लक्षात ठेवलं पाहिजे
दरम्यान, निवडणुका आल्या की ते सांगतात देशात मोदींची लाट नाही. ती लाट आता खाली चालली आहे. सगळे विरोधात गेले आहेत. सगळीकडे आम्हीच निवडून येणार आहोत. प्रत्येक वेळी असं सांगतात आणि ते पुन्हा उघडे पडतात, कारण पुन्हा एकदा मोदीजीच निवडून येतात. असं राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…वारकऱ्यांवर लाठीचार्ज..! “तशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून…” फडणवीसांचं मोठं वक्तव्य
हेही वाचा…वारकऱ्यांवर लाठीचार्ज..! “तशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून…” फडणवीसांचं मोठं वक्तव्य
हेही वाचा…“अजित पवारांच्या नेतृत्वाखालचा गट हा भाजपच्या दगडावर पाय ठेऊन”, सामनातून अजित पवारांवर भाष्य
हेही वाचा…शरद पवारांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात, ‘नर्मदाबाई पटवर्धन’ म्हणून चालवत होता फेसबुक
हेही वाचा…मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा वारकरी आषाढीची पूजा करू देणार नाही