नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत दोन महत्वाच्या घोषणा करत सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे कार्यकारी अध्यक्ष पद सोपवलं आहे. यामध्ये अजित पवारांना कोणतीही जबाबदारी न देण्यात आल्याने अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर खासदार सजंय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी..”, राष्ट्रवादीने नवी जबाबदारी दिल्यानंतर सुळेंची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षातील अंतर्गत घडामोडी आहेत. कोणावर काय अन्याय झाला ही ती व्यक्ती बोलेल ना, बाहेरच्यांनी का बोलावं. त्यांनी त्यांचं वकीलपत्र कोणाला दिले हे मला माहिती नाही. ते समर्थ आहेत. अजित पवार हे विधीमंडळ पक्षाचे नेते आहेत. ते विरोधी पक्षनेते आहेत. दोन्ही पदं खूप महत्वाची आहेत. असंही राऊतांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…पक्षाच्या वर्धापनदिनी शरद पवारांचे धक्कातंत्र! अजित पवारांचा हात मोकळा, मात्र सुप्रिया सुळेंवर मोठी जबाबदारी
दरम्यान, मागील काही दिवसापासून आपल्या भेधडक वक्तव्यामुळे संजय राऊत चर्चेत आले आहेत. त्यांनी अजित पवारांवरही खोचक टोला हाणला होता. त्यावेळी अजित पवारांनी त्यांच्यावर बोलण्याचं टाळलं होतं. आता तीच चूक संजय राऊतांनी टाळली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात याची एकच चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“दिल्लीच्या पातशाहांना पत्र लिहून औरंग्याच्या स्मारकाचा दर्जा काढायला सांगा”, दानवें अन् भाजपात ट्विटवार
हेही वाचा…“शरद पवारांना धमकी देणाऱ्यावर ‘देशद्रोहाचा गुन्हा’ दाखल करा, अन्यथा…”, राष्ट्रवादी भाजपविरोधात आक्रमक
हेही वाचा…“अजित पवारांवर कोणताही अन्याय झालेला नाही”, जयंत पाटलांची नाराजीवर प्रतिक्रिया
हेही वाचा…“हनुमंताची साथ कर्नाटकात मिळाली नाही म्हणून महाराष्ट्रात तुमचीच धाव औरंग्याकडे सुरू”, भाजपवर जहरी टिका
हेही वाचा…“ह्यदयात महाराष्ट्र..अन् नजरेसमोर राष्ट्र.. म्हणत अजित पवाराचं सुचक वक्तव्य, शरद पवारांनी भाकरी फिरवली पण…