दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या काही काळापासून पक्षांमध्ये भाकरी फिरवण्याचे संकेत दिले होते. लोक माझे सांगाती या आत्मकथेच्या प्रकाशन वेळी शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र पक्षांमध्ये मोठा गोंधळ उडाल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला. मात्र आज पक्षाच्या वर्धापन दिली त्यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…शिंदेंचे हे ५ मंत्री भाजपने ब्लॅकलिस्टमध्ये टाकले, भाजप लवकरच ‘या’ मंत्र्यांना नारळ देणार ?
राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसंच खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनील तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री. के.के. शर्मा. पी. पी. महोम्मद फैजल. नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या सर्वांचे मनपुर्वक अभिनंदन असं अजित पवारांनी ट्विट केलं आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! अपघात की घातपात? ठाकरे गटाच्या खासदारावर डम्पर घालण्याचा प्रयत्न, चालकाला अटक
तसेच, शरद पवार यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ह्यदयात महाराष्ट्र.. नजरेसमोर राष्ट्र हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल, राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या प्रत्येक, कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयानं काम करतील हा विश्वास आहे. असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…शिंदेसेनेच्या ‘५’ मंत्र्यांमुळे एकनाथ शिंदेंची भाजपमध्ये गोची, हायकमांडचे आदेश शिंदेंना मानावे लागणार का ?
दरम्यान, अजित पवारांकडे अद्यापही कोणतीही जबाबदारी देण्यात न आल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली. तसेच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्याकडेही या सभेत कोणतेही जबाबदारी देण्यात आलेली नाही.
READ ALSO :
हेही वाचा…“पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी..”, राष्ट्रवादीने नवी जबाबदारी दिल्यानंतर सुळेंची प्रतिक्रिया
हेही वाचा…पक्षाच्या वर्धापनदिनी शरद पवारांचे धक्कातंत्र! अजित पवारांचा हात मोकळा, मात्र सुप्रिया सुळेंवर मोठी जबाबदारी
हेही वाचा…“तर मी खासदारकीचा राजीनामा देईन,” कल्याणमधील भाजप-शिंदे वाद विकोपाला, श्रीकांत शिंदे राजीनामा द्यायच्या तयारीत
हेही वाचा…वादळी वाऱ्याने भाजपच्या कार्यक्रमातील मंडप कोसळला, नेत्यांची फजिती, लोकांचा गोंधळ, नितेश राणेंसह…
हेही वाचा…शिंदेंचे हे ५ मंत्री भाजपने ब्लॅकलिस्टमध्ये टाकले, भाजप लवकरच ‘या’ मंत्र्यांना नारळ देणार ?