धाराशीव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सकाळी मार्निंग वॉकला जात असतांना पाठीमागून ओमराजे निंबाळकर यांच्यावर डम्पर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ओमराजे निंबाळकर यांनी लगेच सावध झाल्याने हा प्रसंग टळला. याप्रसंगी चालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
हेही वाचा…“..तर यापेक्षा जोरदार प्रत्युत्तर देण्यात येईल”, चित्रा वाघ-आव्हाडांमध्ये जुंपली
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर सकाळी नित्यनियमाने मार्निंग वॉकसाठी गोवर्धनवाडी येथे गेले. आपल्या राहत्या घरापासून काही अंतरावरचे गेले असता. त्यांच्यावर डम्फर घालण्याचा प्रयत्न झाला. पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या डम्फरचा आवाज ऐकू आल्याने ओमराजे निंबाळकर बाजूला झाले. त्यांनी सावध भूमिका घेत बाजूला उडी घेतली. यामुळे ओमराजे निंबाळकर या प्रसंगातून वाचले.
हेही वाचा…“तु नक्की भारतात जन्माला आला होता की नेपाळ ला?” राष्ट्रवादीने राणेंना डिवचलं
दरम्यान, या प्रसंगानंतर पोलिसांनी लगेच धाव घेत चालकाला अटक केली आहे. चालकाविरोधात गुन्हा दाखल करून ढोवी पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावर कलम २७९, ३३६, १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डम्पर चालकाने दुचाकीला ओव्हरटेक करताना हा प्रकार झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले असून हा अपघात होता की घातपात करण्याचा प्रयत्न होता. याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…निवडणुकीच्या तोंडावर कोल्हेंचा यॉर्कर, पुण्यातच नवी महानगरपालिका बनवा, कोल्हेंची मागणी
हेही वाचा…शिंदेसेनेच्या ‘५’ मंत्र्यांमुळे एकनाथ शिंदेंची भाजपमध्ये गोची, हायकमांडचे आदेश शिंदेंना मानावे लागणार का ?
हेही वाचा…“फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून गावागावात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न”, एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
हेही वाचा…“हे रक्त नेमकं कुणाचं आहे. ? राष्ट्रवादीचा सवाल, “शरद पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता बावनकुळेंच्या बाजूला
हेही वाचा…मोठी बातमी…! राऊतांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या २ व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात