मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे ठार मारण्याची धमकी ट्विटवरून देण्यात आली आहे. सौरभ पिंपळकर या ट्विवटर हॅंडलवरून ही धमकी आली आहे. तुमचा देखील दाभोळकर होणार, असं म्हणत शरद पवार यांना धमकी देण्यात आली आहे. तसेच राजकारण महाराष्ट्राचं या ट्विटर हॅंडलवरून धमकी देण्यात आली आहे. यातच आता सौरभ पिंपळकर याचा फोटो भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसोबत ट्विट करत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी निशाणा साधला आहे.
हेही वाचा…राज्यात धमकीचे प्रकरण….! मुख्यमंत्री देवदर्शनाला जम्मूत, विरोधकांची जोरदार टिका
शरद पवारांना धमकी देणारा सौरभ पिंपळकर याच्या फेसबुक बायोमध्ये भाजपचा कार्यकर्ता असं लिहिलं आहे. त्यामुळे शरद पवारांना धमकी प्रकरणाशी भाजपशी संबंध आहे का असा सवाल ही अजित पवारांनी केला होता. यातच धमकी देणं आमच्या रक्तात नाही. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करावी असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. आता यातच मिटकरींनी तो फोटो ट्विट करत भाजपवर टिप्पणी केली आहे.
हेही वाचा…“शरद पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता”, खरा मास्टरमाईंड शोधा, अजित पवार
सौरभ पिंपळकर याच्यासोबतच फोटो चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत असलेला एक फोटो ट्विट केला आहे. हे आमच्या रक्तात नाही म्हणणारे बावनकुळे यांनी हे रक्त नेमकं कुणाचं आहे. ? पवार साहेबांना धमकी देणारा पिंपळकर तुमच्या बाजूला केक कापतोय, राजकारण महाराष्ट्राचे नर्मदाबाई पटवर्धन सौरभ पिंपळकर हे ट्विटर अकाऊंट कुणाच्या रक्ताचे असंही मिटकरींनी म्हटले आहे.
हे आमच्या रक्तात नाही म्हणणारे बावनकुळेजी हे रक्त नेमकं कुणाचं आहे? पवार साहेबांना धमकी देणारा पिंपळकर तुमच्या बाजूला केक कापतोय , ‘राजकारण महाराष्ट्राचे’ ‘नर्मदाबाई पटवर्धन’ सौरभ पिंपळकर हे ट्विटर अकाउंट कुणाच्या रक्ताचे?#कराराजवाबमिलेगा@cbawankule pic.twitter.com/G6kBdbnw2O
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 9, 2023
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी…! राऊतांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या २ व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात
हेही वाचा…“..तर यापेक्षा जोरदार प्रत्युत्तर देण्यात येईल”, चित्रा वाघ-आव्हाडांमध्ये जुंपली
हेही वाचा…“तु नक्की भारतात जन्माला आला होता की नेपाळ ला?” राष्ट्रवादीने राणेंना डिवचलं
हेही वाचा…“राज्यात दंगली घडवल्या तर कोणाचा फायदा होतोय हे जगजाहीर”, जयंत पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?
हेही वाचा…“शरद पवारांची काळजी घेतली जाईल, आवश्यकता असल्याच….”, धमकी प्रकरणानंतर शिंदेंची पहिली प्रतिक्रिया