मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ज्या ट्विटर हॅंडलवरून धमकी देण्यात आली. त्या खात्याची खात्री करून कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाऊन तास मुंबई पोलीस आयुक्त यांच्यासोबत बैठक घेतली. यानंतर त्यांनी तात्काळ हे आदेश दिले आहेत. महाराषट्रात धमक्या खपवून घेतले जाणार नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! “तुमचाही दाभोळकर होणार”, शरद पवारांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्याचं नाव आलं समोर
शरद पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. फेसबुखवर तो भाजपचा असल्याचं दिसत आहे. त्यामुळे त्यांच्यामागे मास्टरमाईंड कोण आहे? याचा तपास व्हायला हवा अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. पवारांना धमकी देणारा सौरभ पिंपळकर हा भाजपचा कार्यकर्ता आहे अशी त्याची फेसबुकवर माहिती आहे. त्याला भाजपचा पाठिंबा आहे का? असा सवालही अजित पवारांनी कले आहे.
हेही वाचा…Breaking: राजकारणात खळबळ! शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी, नेमकं काय घडलं?
या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण दोघेही बाहेर असल्याने संपर्क झाला नाही. विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी याचा तपास करावा आणि सौरभ पिंपळकर याला कोणाचा पाठिंबा आहे का? याचाही तपास करावा. त्याचे कॉल रेकॉर्ड तपासावे आणि कारवाई करावी. अशीही अजित पवारांनी मागणी केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“डॉ. दाभोळकरांची हत्या करणाऱ्या शक्ती राज्यात पुन्हा सक्रिय”, काकांना धमकी आल्यानंतर अजित पवारांचं सुचक वक्तव्य
हेही वाचा…“राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही साहेबांसाठी छातीचा कोट करू”, शरद पवारांना धमकी आल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक
हेही वाचा…“आव्हाडांचा मेंदू सडत चाललंय, एंटी चैम्बर मधले विनोद ” चित्रा वाघ अन् आव्हांडामध्ये रंगल वाकृयुद्ध
हेही वाचा…“आव्हाडांचा मेंदू सडत चाललंय, एंटी चैम्बर मधले विनोद ” चित्रा वाघ अन् आव्हांडामध्ये रंगल वाकृयुद्ध
हेही वाचा…राज्यात काय चाललंय? “तर बंदूकीने गोळ्या घालू ,” शरद पवारांना पाठोपाठ राऊतांनीही जीवे ठार मारण्याची धमकी