मुंबई : तुमचाही दाभोळकर करू अशी धमकी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना दिल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली असून गृहविभागाने दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. संजय राऊत आणि सुनील राऊत यांना देखील अशाच प्रकारची धमकी दिल्याने राज्यातील विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर कडाडून टिका केली आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! “तुमचाही दाभोळकर होणार”, शरद पवारांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्याचं नाव आलं समोर
केंद्र आणि राज्य सरकारनं या धमकीची गांभीर्यानं दखल घेऊन आरोपींना तातडीनं गजाआढ करावं. धमकी मागचा खरा मास्टरमाईंड शोधावा. अशा विचारांच्या समाजविघातक शक्तींना वेळीच रोखावं, हेच राज्याच्या हिताचं असेल. पवार साहेबांचं संरक्षण करण्यास महाराष्ट्रातील जनता समर्थ आहे. परंतु डॉ. दाभोळकरांची हत्या करणाऱ्या शक्ती राज्यात पुन्हा सक्रिय झाल्या आहेत, ही बाब अधिक चिंताजनक असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…Breaking: राजकारणात खळबळ! शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी, नेमकं काय घडलं?
निवडणुका जवळ येऊ लागल्यानं यापुढे जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषावादाचे असे मुद्दे उपस्थित करून राज्यात द्वेष निर्माण करण्याचे, दुही माजवण्याचे, मतांच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न होतील, ते हाणून पाडले जातील. देशातील जनता आता सावध आहे. समाजात द्वेष निर्माण करणाऱ्यांच्या भूलथापांना भूलणार नाही. कुणाच्याही कटकारस्थानांना बळी पडणार नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांच्या समस्या, महिलांवरील अत्याचार, वाढती महागाई, वाढती बेरोजगारी याच मुद्यांवर यापुढे महाराष्ट्र ठाम राहिल. विकासाच्या मुद्यांवरून महाराष्ट्राची जनता आता तसूभरही बाजूला हटणार नाही, पवार साहेबांना सोशल मीडियावरून देण्यात आलेली धमकी हा गंभीर मुद्दा असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याची गांभीर्यानं दखल व्हावी. असं अजित पवारांनी मागणी केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवार साहेब यांना जीवे मारण्याची धमकी देणारा हा भाजपचाच कार्यकर्ता”
हेही वाचा…“राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही साहेबांसाठी छातीचा कोट करू”, शरद पवारांना धमकी आल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक
हेही वाचा…“आव्हाडांचा मेंदू सडत चाललंय, एंटी चैम्बर मधले विनोद ” चित्रा वाघ अन् आव्हांडामध्ये रंगल वाकृयुद्ध
हेही वाचा…“आव्हाडांचा मेंदू सडत चाललंय, एंटी चैम्बर मधले विनोद ” चित्रा वाघ अन् आव्हांडामध्ये रंगल वाकृयुद्ध
हेही वाचा…राज्यात काय चाललंय? “तर बंदूकीने गोळ्या घालू ,” शरद पवारांना पाठोपाठ राऊतांनीही जीवे ठार मारण्याची धमकी