मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे ठार मारण्याची धमकी आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे. तुमचाही दाभोळकर करू असं म्हणत सौरभ पिंपळकर आणि राजकारण महाराष्ट्राचं या ट्विटवर हॅंडलवरून धमकी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यावर आता शरद पवारांना धमकी देणारा हा भाजपचाच कार्यकर्ता असं राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…Breaking: राजकारणात खळबळ! शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी, नेमकं काय घडलं?
राज्यात अन् देशात भाजपचं सरकार आहे. शरद पवार साहेब यांना जीवे मारण्याची धमकी देणारा हा भाजपचाच कार्यकर्ता. भाजप सतत समाजमध्ये तेढ निर्माण करणे, मजा अस्थिर करणे, विरोधी पक्ष नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देणे, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवणे, बेताल वक्तव्य करणे हीच भाजप सरकारची कामे असल्याचं रूपाली पाटील यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…संभाजीनगरमधील लोकसभेच्या जागेवरून ठाकरे अन् शिंदे गटात जुंपली, सेनेचे दोन नेते एकमेकांत भिडले
पवार साहेबांसारख्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी येणं म्हणजे विशिष्ठ घटकांवर सरकारची जरब नसल्याचं आणि सध्याचं राज्य सरकार हे नपुसंक असल्याचं सुप्रीम कोर्टाने नोंदवलेलं निरिक्षण योग्य असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं. सरकारला थोडं जरी जबाबदारीचं भान असेल तर या प्रकरणी थातूरमातूर कारवाई न करता धमकी देणाऱ्यांच्या आणि त्यामागील मास्टरमाईंडच्या तातडीन मुसक्या आवळल्या जातील. पण द्वेषाला खतपाणी घालणाऱ्या राज्य सरकारकडून ही अपेक्षा नाही. आज संपुर्ण महाराष्ट्र हा साहेबांसोबत आहेच पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही साहेबांसाठी छातीचा कोट करू. असं आमदार रोहित पवारांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! महाराष्ट्रातील ‘११’ माजी आमदार हैदराबादला रवाना, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची मोठी खेळी
दरम्यान, पवार साहेबांना ट्विटर वरून धमकी देणाऱ्या गुंडांच्या झुंडीने त्यांची निच प्रवृत्ती दाखवली आहे. मागील काही दिवसात मुनगंटीवार, गोप्या व राणे या त्रिकुटांनी जे तोंडसुख घेतले या तिघांची तातडीने चौकशी करून गृहमंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी महाराष्ट्रात अगोदरच कायदा व सुव्यवस्था आपल्या पक्षाने बिघडवून ठेवली आहे परत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार राहतील. कृपया गांभीर्याने घ्यावे. असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.
BJP चे सरकार आहे,मा.शरद पवार साहेब यांना जीवे मारण्याची धमकी देणारा bjp कार्यकर्ताच bhj सतत समाजमध्ये तेढ निर्माण करणे,समाज अस्थिर करणे,विरोधी पक्ष नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देणे,त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवणे,बेताल वक्तव्य करणे हीच आहेत bjp सरकारची कामे
चले जाव नक्कीच— Rupali patil thombare (@Rupalispeak) June 9, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही साहेबांसाठी छातीचा कोट करू”, शरद पवारांना धमकी आल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक
हेही वाचा…“आव्हाडांचा मेंदू सडत चाललंय, एंटी चैम्बर मधले विनोद ” चित्रा वाघ अन् आव्हांडामध्ये रंगल वाकृयुद्ध
हेही वाचा…“आव्हाडांचा मेंदू सडत चाललंय, एंटी चैम्बर मधले विनोद ” चित्रा वाघ अन् आव्हांडामध्ये रंगल वाकृयुद्ध
हेही वाचा…राज्यात काय चाललंय? “तर बंदूकीने गोळ्या घालू ,” शरद पवारांना पाठोपाठ राऊतांनीही जीवे ठार मारण्याची धमकी
हेही वाचा…मोठी बातमी..! “तुमचाही दाभोळकर होणार”, शरद पवारांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्याचं नाव आलं समोर