मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे ठार मारण्याची धमकी आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे. याआधी देखील अशा पद्धतीच्या धमक्या राजकीय नेत्यांना आल्याने एकच चर्चा रंगल्या आहेत. तसेच यावर आता पोलीस काय कारवाई करणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…महायुतीत ‘या’ लोकसभा मतदारसंघावरून शिंदे-फडणवीसांमध्ये वादाची ठिणगी पडणार, अतंर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता ?
अलिकडेच शरद पवार यांनी छत्रपती संभाजीनगरचा नामोउल्लेख औरंगाबाद केल्याचा दावा काही नेत्यांकडून केला जात आहे. याच संदर्भात मागील काही दिवसापासून राज्यातील राजकीय नेते शरद पवारांवर निशाणा साधत आहेत. यातच आता सौरभ पिंपळकर या ट्विवटर हॅंडलवरून ही धमकी आली आहे. तुमचा देखील दाभोळकर होणार, असं म्हणत शरद पवार यांना धमकी देण्यात आली आहे. तसेच राजकारण महाराष्ट्राचं या ट्विटर हॅंडलवरून धमकी देण्यात आली आहे.
हेही वाचा…“गोप्या बोकडासारखा मातलाय,” शरद पवारांवरील टिका पडळकरांना भोवली, राष्ट्रवादी आक्रमक
यातच शरद पवार यांची तुलना औरंगजेबाशी केल्याने भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एक ट्विट केलं आहे. राणेंना धमकी देऊन काहीच फायदा नाही. आम्ही कधीही कोणाच्या धमकीला भीक घातली नाही. समोर आलात तर दोन पायावर घरी परत जाणार नाही लक्षात ठेवा. राहिला विषय पवार साहेबांचा तर त्यांच्यात आणि औरंगजेबमध्ये साम्य आढळणं साहजिक आहे. असं ट्टिट निलेश राणे यांनी केलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…Breaking: राजकारणात खळबळ! शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी, नेमकं काय घडलं?
हेही वाचा…संभाजीनगरमधील लोकसभेच्या जागेवरून ठाकरे अन् शिंदे गटात जुंपली, सेनेचे दोन नेते एकमेकांत भिडले
हेही वाचा…मोठी बातमी..! महाराष्ट्रातील ‘११’ माजी आमदार हैदराबादला रवाना, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची मोठी खेळी
हेही वाचा…घड्याळ्याची साथ सोडून राष्ट्रवादीचा बडा नेता तेलंगणा पक्षात, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
हेही वाचा…पहाटेच्या शपथविधीला अजित पवारांनी ‘त्या’ ३३ आमदारसहं सत्तेचं गणित कसं जुळवलं ? गुपीत फुटलं