पंढरपुर : राज्यात निवडणुकांचा धमाका सुरू होण्यास बराच कालावधी शिल्लक असला तरी राजकीय नेते पक्षप्रवेश करतांना दिसत आहेत. यातच पंढरपुर मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचा बडा नेता तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीत प्रवेश करणार आहे. त्यांना घेण्यासाठी खास चंद्रशेखर राव यांना विमानाची सेवा देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…भाजप खासदाराने ‘द केरला स्टोरी’ पाहण्यासाठी मुलीला थेटरात नेणे, दुसऱ्याच दिवशी मुलगी मुस्लिम प्रियकरासोबत फरार
पंढरपुर मंगळवेढा मतदारसंघात गेल्या पोटनिवडणुकीत अगदी थोड्या मतांनी भगीरथ भालके यांना पराभवाचा धक्का बसला. त्यांना या निवडणुकीत १ लाख ५ हजार मत पडली होती. यातच भगीरथ भालके यांची काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही भेट झाली होती. दरम्यान नाराज भालके यांना आपल्या गोटात घेण्यासाठी चंदशेखर राव यांनी संपर्क साधत भेटीचे निमंत्रण दिले आहे.
हेही वाचा…शिंदे सरकारमध्ये मोठा काळाबाजार, अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे रेट सांगत अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
भागिरथ भालके यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर ते म्हणाले की, मागेच मी स्पष्टपणे सांगितले आहे की, जे राष्ट्रवादी सोडून जात आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला कोणतीही चिंता नाही. चंद्रशेखर राव यांनी पाच ते सहा महिन्यात वातावरण निर्माण केलं आहे. त्याचा सहसा काहीही परिणाम राज्यात दिसणार नाही. असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“फडणवीसांना कोरेगाव दंगली प्रकरणी साक्ष देण्यासाठी विटनेस बॉक्समध्ये बोलवा”, आंबेडकरांच्या मागणीने खळबळ
भगीरथ भालके हे सपत्नीक टीआरएसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष शंकर आण्णा धोंडगे यांच्यासमवेत हैदराबाद इथे गेले. त्यांना घेण्यासाठी खास विमान पाठवण्यात येणार आले. चंद्रशेखर राव यांच्यासोबत त्यांची भेट घेतली. दिवंगत आमदार भारत नाना भालके यांनी पक्षासाठी एवढे काम करूनही अडचणीच्या काळात आपल्याला राष्ट्रवादीने डावलले. गरज असताना आपल्या पाठीशी नेते उभे न राहिल्याने आपल्या अडचणी वाढल्या असल्याचं भालके यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…पहाटेच्या शपथविधीला अजित पवारांनी ‘त्या’ ३३ आमदारसहं सत्तेचं गणित कसं जुळवलं ? गुपीत फुटलं
हेही वाचा…महायुतीत ‘या’ लोकसभा मतदारसंघावरून शिंदे-फडणवीसांमध्ये वादाची ठिणगी पडणार, अतंर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता ?
हेही वाचा…“गोप्या बोकडासारखा मातलाय,” शरद पवारांवरील टिका पडळकरांना भोवली, राष्ट्रवादी आक्रमक
हेही वाचा…“एकंदरीत चित्र काळजी करण्यासारखं”, शरद पवारांनी व्यक्त केली शंका
हेही वाचा…“पडळकराचं गाढवासारखं झालंय, आमदार झालं तरी सुधारत नाही”, राष्ट्रवादीचा खोचक टोला