पुणे : गेल्या काही दिवसापासून भाजप नेते गोपीचंद पडळकर सातत्याने राष्ट्रवादीवर टिका करतांना दिसत आहेत. यातच त्यांनी सोलापुर येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख तर रोहित पवारांना माकड म्हणून संबोधले होते. त्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून जहरी टिका करण्यात आली. यातच राष्ट्रवादीचे युवाकार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांंनी पडळकरांवर खोचक टिका केली आहे.
हेही वाचा…भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणी फडणवीसांचा चौकशी करा, आंबडेकरांची मागणी, फडणवीस म्हणाले, आमचं सरकार…
एक गाढव होतं मालकांनी त्याच्यासाठी छान गोठा बनवला. भरपुर हिरवा चारा खाऊ घातला नंतर त्याला साबण लावून धुतले व फेरफटका मारण्यासाठी गाढवाला सोडले. गाढव तेथून उकीरड्यावर गेले आणि लोळू लागले. हे पाहून मालकांनी कपाळावर हात मारून घेतला. पडळकराचं गाढवासारखं झालं आहे. आमदार झालं तरी सुधारत नाही. असा टोला सुरज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…खोक्यांवरून कृपाल तुमने अन् अजित पवारांमध्ये वार-पलटवार, अजित पवार म्हणाले, “तर राजकारण सोडून देईन”
दरम्यान, दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे धनगर समाजाच्या वतीने गोपीचंद पडळकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी टीका केली. रोहित पवार अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रसाद वाटत होते. पण धनगरांच्या घरी प्रत्येक वर्षाला चार बोकड कापतात. पण त्यांच्या दावणीला किती कोंबडं असतात, हे तुला माहिती नाही का माकडा? असे म्हणत गोपीचंद पडळकरांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली.
एक गाढव होतं मालकांनी त्याच्यासाठी छान गोठा बनवला,भरपूर हिरवा चारा खाऊ घातला नंतर त्याला साबण लावून धुतले व फेरफटका मारण्यासाठी गाढवाला सोडले गाढव तेथून उकीरड्यावर गेले आणि लोळू लागले.हे पाहून मालकांनी कपाळावर हात मारून घेतला.पडळकराच गाढवासारखं झालं आहे आमदार झालं तरी सुधारत नाही
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) June 6, 2023
READ ALSO :
हेही वाचा…भाजप खासदाराने ‘द केरला स्टोरी’ पाहण्यासाठी मुलीला थेटरात नेणे, दुसऱ्याच दिवशी मुलगी मुस्लिम प्रियकरासोबत फरार
हेही वाचा…शिंदे सरकारमध्ये मोठा काळाबाजार, अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे रेट सांगत अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…“फडणवीसांना कोरेगाव दंगली प्रकरणी साक्ष देण्यासाठी विटनेस बॉक्समध्ये बोलवा”, आंबेडकरांच्या मागणीने खळबळ
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या बडा नेत्याची एंन्ट्री तेलंगणाच्या पक्षात, पक्ष प्रवेश घेण्यासाठी पाठवलं खास विमान महाराष्ट्रात
हेही वाचा…“…तोपर्यंत जनतेची फसवणूक थांबणार नाही”, अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल