पंढरपुर : राज्यात निवडणुकांचा धमाका सुरू होण्यास बराच कालावधी शिल्लक असला तरी राजकीय नेते पक्षप्रवेश करतांना दिसत आहेत. यातच पंढरपुर मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचा बडा नेता तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीत प्रवेश करणार आहे. आज सांयकाळी त्यांना घेण्यासाठी खास चंद्रशेखर राव यांना विमानाची सेवा देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…जागा दोन, दावेदार पाच, लोकसभेच्या ‘या’ २ मतदारसंघात “हाय व्होल्टेज ड्रामा”
पंढरपुर मंगळवेढा मतदारसंघात गेल्या पोटनिवडणुकीत अगदी थोड्या मतांनी भगीरथ भालके यांना पराभवाचा धक्का बसला. त्यांना या निवडणुकीत १ लाख ५ हजार मत पडली होती. यातच भगीरथ भालके यांची काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही भेट झाली होती. दरम्यान नाराज भालके यांना आपल्या गोटात घेण्यासाठी चंदशेखर राव यांनी संपर्क साधत भेटीचे निमंत्रण दिले आहे.
हेही वाचा…शिंदेंच्या मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ १४ जणांचं होणार समावेश, छोटेखानी होणार कार्यक्रम ?
आज भगीरथ भालके हे सपत्नीक टीआरएसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष शंकर आण्णा धोंडगे यांच्यासमवेत हैदराबाद इथे जाणार आहे. त्यांना घेण्यासाठी खास विमान पाठवण्यात येणार आहे. आज सांयकाळी चंद्रशेखर राव यांच्यासोबत त्यांची भेट होणार आहे. दिवंगत आमदार भारत नाना भालके यांनी पक्षासाठी एवढे काम करूनही अडचणीच्या काळात आपल्याला राष्ट्रवादीने डावलले. गरज असताना आपल्या पाठीशी नेते उभे न राहिल्याने आपल्या अडचणी वाढल्या असल्याचं भालके यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“…तोपर्यंत जनतेची फसवणूक थांबणार नाही”, अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
हेही वाचा…भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणी फडणवीसांचा चौकशी करा, आंबडेकरांची मागणी, फडणवीस म्हणाले, आमचं सरकार…
हेही वाचा…खोक्यांवरून कृपाल तुमने अन् अजित पवारांमध्ये वार-पलटवार, अजित पवार म्हणाले, “तर राजकारण सोडून देईन”
हेही वाचा…पुणे लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी ठाम, कार्यकर्ते लागले कामाला, उमेदवार शरद पवार ठरवणार
हेही वाचा…शरद पवारांची ‘गुगली’ : विलास लांडेंचे ‘रि-लाँचिंग’ अन् डॉ. अमोल कोल्हे ‘क्लिनबोल्ड’