कोल्हापुर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू करून दिली आहे. लोकसभा मतदारसंघावरून सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीत रस्सीखेच बघायला मिळत आहेत. यातच राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी कोल्हापुर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडी आणि महायुतीत हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“शिंदे सरकारमध्ये ज्यांना मंत्रीपद मिळणार नाही, ते पळून जातील,” शिवसेनेचा खोचक टोला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. शिंदेसह फडणवीस यांची महायुती तर राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेस आणि शिवसेना उबाठा यांची महाविकास आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीत आमनेसामने येणार आहेत. मात्र दोन्ही बाजूंनी लोकसभा जागावाटपावरून धुमचर्क्री सध्या सुरू आहेत. यातच कोल्हापुर आणि हातगणंकले लोकसभा मतदारसंघावर दावे-प्रतिदावे केले जात आहेत.
हेही वाचा…” एकनाथ खडसेंनी भाजपात पुन्हा यावे,” भाजप नेत्याची ऑफर, एकनाथ खडसे म्हणाले की, “ज्या पक्षात…”,
कोल्हापुर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा शिवसेनेचे संजय मंडलिक यांनी पराभव केला होता. तर हातगणंकले लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या धैर्यशीलराव माने यांनी राष्ट्रवादी-काॅंग्रेस प्रणित स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांच्यावर विजय मिळवला होता. आता या दोन्ही मतदारसंघासाठी भाजप-शिंदे, ठाकरे गट, राष्ट्रवादी दावा सांगत आहेत. तर दुसऱ्याबाजूला रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत हे देखील निवडणुक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे जागा दोन, दावेदार पाच असा राजकीय पेच निर्माण झाला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदेंच्या मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ १४ जणांचं होणार समावेश, छोटेखानी होणार कार्यक्रम ?
हेही वाचा…“..तोपर्यंत मी गडावरून उतारणार नाही,” संभाजी राजेंचं शिवभक्तांना आवाहन
हेही वाचा…“बापात बाप नाही अन् लेकात लेक नाही, अशी महाविकास आघाडीची अवस्था”, प्रकाश आंबेडकरांची टिका
हेही वाचा…“नितीश कुमारांचा उद्धव ठाकरेंना फोन, ‘या’ विषयांवर चर्चा, राजकारण तापणार ?
केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाला लॉटरी, तर भाजपच्या खासदार मंत्र्यांना मिळणार डच्चू ?