मुंबई : आगामी लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु त्याआधी जागावाटपावरून महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये खडाजंगी बघायला मिळत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार का ? असा संशय व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी यावर भाष्य केले आहे.
हेही वाचा…“पटोलेंना त्यांच्या पक्षात टॉयलेटला जायचं असेल तरी परवानगी घ्यावी लागते”, फडणवीसांचा टोला
बापात बाप नाही अन् लेकात लेक नाही, अशी महाविकास आघाडीची अवस्था आहे. मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न अनेकजण बघत आहेत. त्याऐवजी आघाडीने जागा वाटपावर लक्ष केंद्रीत करावे, खुद्द शरद पवार महाविकास आघाडीतील जागावाटप पुढे सरकत नसल्याची खंत व्यक्त करतात, परंतु हा विषय भिजत ठेवायचा आणि दुसरीकडे मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांची चर्चा करायची हा एक गेम सुरू आहे. त्यामागे ज्यांची चौकशी सुरू आहे तेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदावर दिसत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा…“काही गोष्टींंचं तारतम्य आहे का नाही”, ? अजित पवार बावनकुळेंवर भडकले
दरम्यान, अलिकडेच महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांचे ” भावी मुख्यमंत्री” म्हणून बॅनर झळकले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार, काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आदित्य ठाकरे यांचा समावेश आहे. त्यावरून प्रकाश आंबडेकर यांनी त्यावर खोचक टिप्पणी केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“नितीश कुमारांचा उद्धव ठाकरेंना फोन, ‘या’ विषयांवर चर्चा, राजकारण तापणार ?
केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाला लॉटरी, तर भाजपच्या खासदार मंत्र्यांना मिळणार डच्चू ?
हेही वाचा…“शिंदे सरकारमध्ये ज्यांना मंत्रीपद मिळणार नाही, ते पळून जातील,” शिवसेनेचा खोचक टोला
हेही वाचा…” एकनाथ खडसेंनी भाजपात पुन्हा यावे,” भाजप नेत्याची ऑफर, एकनाथ खडसे म्हणाले की, “ज्या पक्षात…”,
हेही वाचा…“कारल्याला काही कारलं येत नाही अन् सूनबाई काही माहेरी जात नाही”, बच्चू कडूंची मंत्रिमंडळ विस्तारावर खोचक टिप्पणी