पुणे : राज्यात ज्या ज्या वेळी ओबीसी समाजांना न्याय देण्याचा विषय आहे. त्या त्या वेळी फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्याला विरोध केला. या राज्यात ओबीसी समाजाचा खरा शत्रू हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच आहे असा आरोप, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केला आहे. त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये राहून अजित पवार कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत”
ओबीसी समाजाला योग्य प्रतिनिधीत्व मिळत नव्हते. त्यासाठी महाविकास आघाडीने सत्तेत असताना ओबीसी समाजाला त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. यातून सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय सर्वांसमोर आहे. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले, त्यांना सत्तेत येऊन वर्ष व्हायला आले तरी त्यांनी निवडणुका घेतलेल्या नाहीत. तरीदेखील दुसऱ्यांकडे बोटं दाखवली जात आहेत. एक बोट राष्ट्रवादीकडे करताना तीन बोटं त्यांच्याकडे आहेत, या गोष्टीचे तारतम्य त्यांना आहे का, असा सवाल अजित पवारांनी केला. तसेच आमची भूमिका स्पष्ट आहे, त्यानुसार आम्ही काम करतो. कोणत्याही निवडणुका नजरेसमोर ठेवून गोष्टी करण्याची आमची भूमिका नाही, असे स्पष्ट प्रतिपादन अजित पवार यांनी केले.
हेही वाचा…“काम केलं नाही तर कानाखाली देऊन पद काढून घेईन,” अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सुनावलं
दरम्यान, “आमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ओबीसी नेते आहेत. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी आहेत. परंतु राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात ओबीसी आहेत का? राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री ओबीसी आहेत का? छगन भुजबळ स्वत: ला ओबीसी नेते म्हणवतात, पण सरकारमध्ये असताना अन्न आणि नागरी पुरवठा विभाग घेऊन बसले होते. त्यांना तिथे महत्व नाही.” असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, शरद पवार जाहीर केले नाव
हेही वाचा…शरद पवारांचा एकेरी उल्लेख, तर रोहित पवारांना ‘माकड’ म्हणून संबोधले, पडळकरांची राष्ट्रवादी काँग्रेसवर जहरी टिका
हेही वाचा…पुणे जिल्ह्यात पवारांना शह देण्यासाठी भाजपाचा ‘फडणवीस पॅटर्न’, मंत्रीपदाच्या शर्यतीत आमदार महेश लांडगे ‘डार्क हॉर्स’
हेही वाचा…“मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार,” अमित शाह यांच्या भेटीनंतर शिंदेंचं वक्तव्य
हेही वाचा…“एकनाथ शिंदे गटातीलच आमदार सरकारच्या विरोधात जलसमाधी घेणार”, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात