पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आढावा बैठका घेत आहेत. यातच पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदार संघातून पुढील निवडणूक कोण लढवणार? याबाबत चर्चा केल्या जात होत्या. माजी आमदार विलास लांडे यांचे अलिकडेच भावी खासदार म्हणून बँनर लागले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमोल कोल्हे की विलास लांडे अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज शिरूर लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…“काम केलं नाही तर कानाखाली देऊन पद काढून घेईन,” अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सुनावलं
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस मोर्चेबांधणी करीत आहे. यातच आज शिरूर लोकसभा आणि जालना लोकसभा मतदार संघाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी शरद पवार यांच्या सह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार सुनील तटकरे, आदी उपस्थित होते. यावेळी सर्वांच्या मताने शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी अमोल कोल्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यामुळे मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या वादावर अखेर आज पडदा पडला.
हेही वाचा…बेरात्री एकनाथ शिंदे-फडणवीसांची अमित शाह यांच्याशी खलबतं.. त्या बैठकीत चर्चा नेमक्या कशावर ?
यावेळी अमोल कोल्हे म्हणाले की, मी कला क्षेत्रात कार्यरत असल्याने थोडासा जनसंपर्क कमी झालेला होता यापूर्वी ज्या प्रकल्पांसाठी मी शब्द दिला होता त्या पूर्ण करणे देखील माझ्यासाठी महत्त्वाचे होते पण गेल्या चार वर्षात बैलगाडा शर्यत, पुणे नाशिक महामार्ग या दोन प्रमुख विषयांवर मी निवडणूक लढवली होती, हे दोन्ही विषय पूर्ण झालेले आहेत आगामी काळात देखील शिरूर मतदार संघात अनेक मोठ्या महामार्गांचे काम होणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांचा एकेरी उल्लेख, तर रोहित पवारांना ‘माकड’ म्हणून संबोधले, पडळकरांची राष्ट्रवादी काँग्रेसवर जहरी टिका
हेही वाचा…पुणे जिल्ह्यात पवारांना शह देण्यासाठी भाजपाचा ‘फडणवीस पॅटर्न’, मंत्रीपदाच्या शर्यतीत आमदार महेश लांडगे ‘डार्क हॉर्स’
हेही वाचा…“मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार,” अमित शाह यांच्या भेटीनंतर शिंदेंचं वक्तव्य
हेही वाचा…“एकनाथ शिंदे गटातीलच आमदार सरकारच्या विरोधात जलसमाधी घेणार”, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
हेही वाचा…“राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये राहून अजित पवार कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत”