पुणे : मागील काही महिन्यापासून राज्यात भावी मुख्यमंत्र्याचं बॅनर लावण्याचं प्रमाण जास्तच वाढलं आहे. राष्ट्रवादी, काॅंग्रेस तसेच शिवसेना आणि भाजपमध्ये देखील राजकीय नेत्यांचं भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागत आहेत. यातच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीत राहून कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत. असं विधान शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी काढलं आहे.
हेही वाचा…“..तर राजकारणातून संन्यास घेईन,” फडणवीसांचा ‘तो’ जुना व्हिडीओ राष्ट्रवादीने लावला, राजकारण तापणार
आम्ही विरोधक असलो तरी सांगतो की, अजित पवार कर्तबगार नेते आहेत. त्यामुळे ते राष्ट्रवादीत राहून कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत. आता त्यांनी काय ते ठरवलं पाहिजे. राज्याच्या राजकारणात काही चणाक्य नेते आहेत. त्यांच्याशी बोललं पाहिजे. असं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रालय झाला भ्रष्टाचाराचा अड्डा”
आगामी लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना महत्वाच्या सुचना दिल्या. तसेच पदाधिकाऱ्यांनी पक्षाचं काम केलं नाहीतर कानाखाली देऊन पद काढलं जाईल. असा इशाराही अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला. त्यामुळे पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये धाकधुक वाढली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“काम केलं नाही तर कानाखाली देऊन पद काढून घेईन,” अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सुनावलं
हेही वाचा…बेरात्री एकनाथ शिंदे-फडणवीसांची अमित शाह यांच्याशी खलबतं.. त्या बैठकीत चर्चा नेमक्या कशावर ?
हेही वाचा…“भाजपचे प्रदेशाध्यक्ष, पंतप्रधान ओबीसी नेते, राष्ट्रवादीत ओबीसी आहेत का?” भाजपचा खोचक सवाल
हेही वाचा…देशाचा रेल्वे मंत्री कोण? रेल्वे गाड्यांना हिरवा सिग्नल कोण दाखवतो? माजी मंत्र्यांचा सवाल
हेही वाचा…“धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना सल्ला, त्यावर पंकजा मुंडेंचा धनुभाऊंना टोला”, एकच चर्चा