बीड : भाजपबाबत केलेल्या वक्तव्याबाबत भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे राज्याच्या राजकारणात चर्चेत आल्या. आज दिवंगत भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी गोपीनाथ गडावर साजरी करण्यात आली. यावेळी पंकजा मुंडे यांनी जोरदार भाषण करीत आपली पुढील भूमिका त्यांनी स्पष्ट केली. त्यावर त्यांनी धनंजय मुंडे यांना देखील टोला हाणला.
हेही वाचा…एकनाथ खडसेंनी पंकजा मुंडेंना दिला कानमंत्र, भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
गोपीनाथ मुंडे ज्यावेळी भाजपमध्ये होते. त्यावेळी भाजपचं नेतृत्व वेगळं होतं. आता सर्व बदललं आहे. पंकजा मुंडे जी माझी बहिण आहे. तिने भाजपच्या या महासागरात बोलतांना आपलं पक्षात नुकसान तर होणार नाही ना. याचा विचार केला पाहिजे, कारण आता प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंची पुण्याई त्यांच्या मागे आहे. मुंडे साहेबांनी भाजपला भरपुर दिलं. तसं भाजपने देखील मुंडे साहेबांना खुप काही दिलं. पंकजा ताईंना देखील भाजपने खुप काही दिलं. असे धनंजय मुंडे म्हणाले होते.
हेही वाचा…“संजय राऊत बोलल्यानं आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत”, अजित पवारांचा राऊतांवर पलटवार
ज्यांना संधी चालून आली, ते मला सल्ले देत आहेत. माझ्या जीवनात संयमांशिवाय काहीच महत्वाचं नाही. असं म्हणत पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडे यांना टोला लगावला आहे. मला कुणाकडूनही कसलीही अपेक्षा नाही. पद मिळवण्यासाठी मी कोणाकडेही जाणार नाही. माझं राजकारण हे जनतेसाठी आहे. सर्वच पक्षांमध्ये बदल होत असतात. माझ्या पक्षातही अनेक बदल झालेत. लोकांच्या हितासाठी भूमिका बदलायच्या असतात. मनात काही साठवून ठेवलं नाही. परंतु माझ्या खांद्यावर अनेक बंदूका विसवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे मी कुणाच्याही खांद्यावर बंदूक ठेऊन चालणार नाही. याबाबत लवकरच अमित शहा यांची भेट घेणार. असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…“..तर राजकारणातून संन्यास घेईन,” फडणवीसांचा ‘तो’ जुना व्हिडीओ राष्ट्रवादीने लावला, राजकारण तापणार
हेही वाचा…“शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रालय झाला भ्रष्टाचाराचा अड्डा”
हेही वाचा…गोपीनाथ गडावर पंकजा मुंडेंनी मांडली पुढची भूमिका, अमित शहांची भेट घेणार, वातावरण तापणार?
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीसांनी नवनीत राणांचा गेम करण्याचं ठरवलं”, सुषमा अंधारेंचं नवनीत राणांवर सुचक वक्तव्य
हेही वाचा…“भाजप बद्दल पंकजाताईंची उद्वग्निता निर्माण होणं…”, पंकजा मुंडेंच्या नाराजींवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया