बीड : भाजपबाबत केलेल्या वक्तव्याबाबत भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे राज्याच्या राजकारणात चर्चेत आल्या. यानंतर पंकजा मुंडे यावर आपली काय भूमिका मांडणार ? त्याकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलं होत. आज दिवंगत भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी गोपीनाथ गडावर साजरी करण्यात आली. यावेळी पंकजा मुंडे यांनी जोरदार भाषण करीत आपली पुढील भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
हेही वाचा…राष्ट्रवादीचा ‘बडा’ नेता बीआरएस पक्षाच्या वाटेवर, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
मला कुणाकडूनही कसलीही अपेक्षा नाही. पद मिळवण्यासाठी मी कोणाकडेही जाणार नाही. माझं राजकारण हे जनतेसाठी आहे. सर्वच पक्षांमध्ये बदल होत असतात. माझ्या पक्षातही अनेक बदल झालेत. लोकांच्या हितासाठी भूमिका बदलायच्या असतात. मनात काही साठवून ठेवलं नाही. परंतु माझ्या खांद्यावर अनेक बंदूका विसवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे मी कुणाच्याही खांद्यावर बंदूक ठेऊन चालणार नाही. याबाबत लवकरच अमित शहा यांची भेट घेणार. असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं.
हेही वाचा…तीन रेल्वेंचा भीषण अपघात, २३३ मृ्त्यू,..! ‘त्या’ कवच सिस्टमने येथे काम का केले नाही,? काॅंग्रेसचा भाजपला सवाल
गेल्या पाच वर्षात अनेक अनुभव आलेत. लोकांसाठी राजकारण केले. ज्यादिवशी मी समोरच्या माणसाला आवडेल ते बोलणार नाही. त्यादिवशी मला राजकारणाच्या मंचावर उभं राहण्याचा अधिकार नाही. म्हणून आज मीडियाचे आभार मानते. त्यांचे माझ्यावर उपकार आहेत. कारण माझं म्हणणं त्यांनी योग्य ठिकाणी पोहोचवलं. माझ्या माणसापर्यंत ते बरोबर पोहोचलं. त्यामुळे त्यांना आज वाटतंय की ताई काय बोलणार. असंही त्या म्हणाल्या.
READ ALSO :
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीसांनी नवनीत राणांचा गेम करण्याचं ठरवलं”, सुषमा अंधारेंचं नवनीत राणांवर सुचक वक्तव्य
हेही वाचा…“भाजप बद्दल पंकजाताईंची उद्वग्निता निर्माण होणं…”, पंकजा मुंडेंच्या नाराजींवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
हेही वाचा…एकनाथ खडसेंनी पंकजा मुंडेंना दिला कानमंत्र, भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हेही वाचा…“संजय राऊत बोलल्यानं आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत”, अजित पवारांचा राऊतांवर पलटवार
हेही वाचा…पुणे लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी-काॅंग्रेस आमनेसामने, काॅंग्रेसच्या आजच्या बैठकीत मोठा निर्णय ?