पुणे : महाविकास आघाडीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काॅंग्रेसने पुणे लोकसभा मतदारसंघावर दावा केला असला तरी कोणत्याही परिस्थितीत लोकसभेची पुण्याची जागा काॅंग्रेसनेचेे लढविण्याची भूमिका स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील काॅंग्रेसची ताकद कशी आहे. हे मुंबई येथे होणाऱ्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी काॅंग्रेस- काॅंग्रेस पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“संजय राऊत थोड्या दिवसांनी स्वत:चे कपडे फाडून रस्त्यावर फिरणार”, शिंदे गटाची जहरी टिका
महाविकास आघाडीत लोकसभा मतदारसंघांचे जागावाटप होतांना २०१९ च्या निवडणुकीतील निकालाच्या आधारे होणार नाही, अशी भूमिका काॅंग्रेसने घेतली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काॅंग्रेसची केवळ एकच जागा निवडून आली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपात काॅंग्रेसला दुय्यम जागा मिळण्याची शक्यता आहे. २०१९ ची परिस्थिती व आताची परिस्थिती यात फरक आहे. त्यामुळे सर्व बांजूचा विचार करून जागावाटपाचा निर्णय घेतला जाईल. असं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…आमदार अण्णा बनसोडेंचा महापालिकेला मोठा दणका, महापालिका आयुक्ताला दिला ‘हा’ इशारा
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काॅंग्रेसच्या आढावा बैठका मुंबईत आयोजित केल्या आहेत. या बैठकीत लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा केली जात आहे. यातच आता पुणे लोकसभा मतदारसंघाबाबत काॅंग्रेस काय भूमिका घेणार ? ते पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीचा ‘बडा’ नेता बीआरएस पक्षाच्या वाटेवर, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा…तीन रेल्वेंचा भीषण अपघात, २३३ मृ्त्यू,..! ‘त्या’ कवच सिस्टमने येथे काम का केले नाही,? काॅंग्रेसचा भाजपला सवाल
हेही वाचा…“धरणात मु$#@ पेक्षा थुंकलेल चांगलं”, राऊतांची जीभ घसरली, अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला
हेही वाचा…“अरे टिल्ल्या तुझ्यात हिम्मत असेल तर…”, मिटकरी अन् नितेश राणेंमध्ये शाब्दिक चकमक
हेही वाचा…कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलह? लोकसभा आढावा बैठकीसाठी ‘या’ बड्या नेत्यांना बोलवलंच नाही