मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात सातत्याने चर्चेत राहिले आहेत. यातच शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांच्याबाबत प्रश्न विचारले असता राऊतांनी आक्षेपार्ह कृती केली. त्यानंतर त्यांच्यावर सर्व राजकीय पक्षांकडून टिका करण्यात आली. यातच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील यावर भाष्य केलं. त्यानंतर राऊतांनी अजित पवारांना खोचक टोला हाणला आहे.
हेही वाचा…“खरा शिवराज्याभिषेक ६ जून 2024 ला…! मग आज साजरा करण्याचा विचार कोणाच्या सुपीक डोक्यातून बाहेर पडला ?
महाराष्ट्रात संस्कृती, परंपरा आहे. आपला काही इतिहास आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असू शकतो आणि काम करू शकतो ते देशाला दाखवून दिलं आहे. मला दुसरी एक बाजू ऐकायला मिळाली की, ते म्हणाले मला काहीतरी त्रास होत होता म्हणून तसं केलं. माझा त्यामागचा हेतू तो नव्हता असंही त्यांनी म्हटलं. पण प्रत्येकानं तारतम्य ठेवून वागावं, असं अजित पवार म्हणाले.
हेही वाचा…“फक्त शारिरिक भूक भागवायला भाजप नेत्यांना मुली हव्या आहेत का?” काॅंग्रेसची भाजपवर जहरी टिका
त्यानंतर संजय राऊतांनी अजित पवारांना अप्रत्यक्षपणे टोला हाणला. धरणात मुतण्यापेक्षा थंकणं चांगलं. प्रत्येकानं संयम राखला पाहिजे. परंतु ज्याचं जळतं त्याला कळतं. आम्ही भोगून सुद्धा जमीनीवर आहोत. आम्ही इकडे तिकडे पळालो नाही. आमच्यावर संकट येताहेत. भाजपसोबत सुत जुळवण्याचा आमचा प्रयत्न नाही. तसेच या देशातील १३० कोटी जनतेला माफी मागावी लागेल. असंही राऊतांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“अरे टिल्ल्या तुझ्यात हिम्मत असेल तर…”, मिटकरी अन् नितेश राणेंमध्ये शाब्दिक चकमक
हेही वाचा…कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलह? लोकसभा आढावा बैठकीसाठी ‘या’ बड्या नेत्यांना बोलवलंच नाही
हेही वाचा…“संजय राऊत थोड्या दिवसांनी स्वत:चे कपडे फाडून रस्त्यावर फिरणार”, शिंदे गटाची जहरी टिका
हेही वाचा…आमदार अण्णा बनसोडेंचा महापालिकेला मोठा दणका, महापालिका आयुक्ताला दिला ‘हा’ इशारा
हेही वाचा…ठरलं तर..! कोण, अन् कोणत्या जागांवर लढणार, काॅंग्रेसचा लोकसभा निवडणुकीसाठी गेमचेंजर प्लॅन ?