मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील राजकीय पक्षांनी आढावा बैठकांचा धडाका सुरू करून दिला आहे. राष्ट्रवादी पाठोपाठ आज काॅंग्रेस भवन येथे काॅंग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत नेमकी कशावर चर्चा झाली? त्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद दिली. तर या बैठकीत काॅंग्रेसमधील अंतर्गत कलह बघायला मिळाला.
हेही वाचा…“छत्रपती शिवाजी ह्या नावाने माझं आयुष्य व्यापलं”, शिवराज्याभिषेकाच्या दिवशी राज ठाकरे भावूक
या बैठकीसाठी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नेते हजर होते. यातच संबंधित लोकसभा मतदारसंघातील प्रमुख नेते, जिल्हा प्रभारी, आजी माजी खासदार, आमदार, जिल्ह्याध्यक्ष, २०१९ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील काॅंग्रेसचे उमेदवारी, जिल्ह्यातील आघाडी संघटना व विभागाचे अध्यक्ष यांना बोलावले जाणार आहे.
हेही वाचा…“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सिंहासन लवकरच हालणार,” पवार-शिंदे भेटीनंतर सुचक संकेत
परंतु नागपुरात शहारातील माजी खासदार आणि माजी आमदार यांना निमंत्रण मिळाले नाही. शहाराध्यक्ष विकास ठाकरे यांनी जाणिवपुर्वक असे केल्याचा आरोप होत असून अशाप्रकारे शहरातील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. याचसोबत आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापुर्वी स्थानिक पातळीवरील वस्तुस्थिती जाणून घेणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसबरोबर काॅंग्रेसची आघाडी आधीपासून आहेच पण आता या आघाडीत शिवसेनाही आहे. त्यामुळे निवडणुकीत स्थानिक पातळीवर समन्वय राहणे महत्वाचे आहे. चर्चाअंती महाविकास जो उमेदवार ठरेल त्याला निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. काॅंग्रेस पक्ष राज्यातील ४८ मतदारसंघातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी दोन दिवसांची आढावा बैठक घेत आहे असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“संजय राऊत थोड्या दिवसांनी स्वत:चे कपडे फाडून रस्त्यावर फिरणार”, शिंदे गटाची जहरी टिका
हेही वाचा…आमदार अण्णा बनसोडेंचा महापालिकेला मोठा दणका, महापालिका आयुक्ताला दिला ‘हा’ इशारा
हेही वाचा…ठरलं तर..! कोण, अन् कोणत्या जागांवर लढणार, काॅंग्रेसचा लोकसभा निवडणुकीसाठी गेमचेंजर प्लॅन ?
हेही वाचा…“खरा शिवराज्याभिषेक ६ जून 2024 ला…! मग आज साजरा करण्याचा विचार कोणाच्या सुपीक डोक्यातून बाहेर पडला ?
हेही वाचा…“फक्त शारिरिक भूक भागवायला भाजप नेत्यांना मुली हव्या आहेत का?” काॅंग्रेसची भाजपवर जहरी टिका