मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज ३५० वा शिवराज्यभिषेक सोहळा रायगडावर साजरा केला आहे. या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील मंत्री खासदार उपस्थित आहेत. या कार्यक्रमासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील उपस्थिती लावली. त्याबाबत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…उद्धव ठाकरे परदेशात, शरद पवारांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, भेटीचं कारण आलं समोर
३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर जाऊन मी माझं कुटूंब आणि माझ्या सहकाऱ्यांनी केलं. महाराजांच्या ३०० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने तेव्हा शिवतीर्थावर बाबासाहेब पुरंदरेंनी शिवसृष्टी आणली होती. तेव्हा मी स्वर्गीय बाळासाहेबांसोबत जवळ जवळ रोज जायचो. त्यावेळेला संध्याकाळी रोज सात वाजता शिवराज्याभिषेख सोहळा व्हायचा. तो मी दररोज बघायचो आणि तो मला तोंडपाठ झाला होता. तो क्षण होती की छत्रपती शिवाजी ह्या नावाने माझं आयुष्य व्यापलं, भारावलं, जे अजूनही तसंच आहे. आणि आयुष्यभर हे मंतरलेपण राहील. असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…मावळसाठी राष्ट्रवादीचा मेगा प्लॅन…! पार्थ पवारांना ‘या’ बड्या नेत्याच्या मुलीला राष्ट्रवादी रिपलेस करणार ?
पुढे ते असे म्हणाले की, मी अनेकदा रायगडावर गेलो आहे. प्रत्येकवेळी तिथे एक वेगळीच ऊर्जा जाणवते. पण आज जे मी अनुभवलं, ते विलक्षण होतं. मी नेहमी म्हणतो शिवचरित्र वाचल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे हा सामान्यांनी घडविलेला असामान्य इतिहास आहे. मी काल म्हणलं तसं ते एक युगप्रवर्तनच होतं. आणि शिवराज्याभिषेक हा त्या युगप्रवर्तनातील अतिशय महत्वाचा टप्पा होता.
हेही वाचा…राष्ट्रवादी पाठोपाठ काॅंग्रेसही लागली कामाला..! लोकसभा मतदारसंघासाठी हालचाली वाढल्या, अन् उमेदवारांच्या..
ह्या हिंद भूमीच्या स्वाभिमानासाठी, स्वत्वसाठी या रयतेच्या राजाला राजसिंहासनाची, राज्याभिषेकाची नितांत गरज होती. हा सुवर्णक्षण पुढची अगणित वर्ष ह्या हिंद भूमीला प्रेरणा देत राहिल इतकी ताकद ह्या घटनेत आहे. तेव्हा छत्रपती महाराजांचा जयघोष मनामनात घुमू दे आणि त्यांचे विचार आपल्या मराठी जनांच्या धमण्यामंधून वाहू देत, हीच इच्छा आणि हीच आजच्या दिवशी शिवचरणी प्रार्थना. असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर जाऊन मी माझं कुटुंब आणि माझ्या सहकाऱ्यांनी महाराजांना अभिवादन केलं.
महाराजांच्या ३०० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने तेंव्हा शिवतीर्थावर बाबासाहेब पुरंदरेंनी शिवसृष्टी आणली होती. तेंव्हा मी स्वर्गीय… pic.twitter.com/b7qq8DtjKi
— Raj Thackeray (@RajThackeray) June 2, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सिंहासन लवकरच हालणार,” पवार-शिंदे भेटीनंतर सुचक संकेत
हेही वाचा…शिवराज्याभिषेक सोहळा..! मुख्यमंत्री पुजेला खाली बसले, मात्र छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजेंना प्रेक्षक म्हणून उभं केलं, राष्ट्रवादीची टिका
हेही वाचा…मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा..! उद्धव ठाकरेंसाठी शरद पवार सोडणार ‘हे’ दोन लोकसभा मतदारसंघ
हेही वाचा…“भाऊ बहिणींसाठी धावला अन् निवडणुक बिनविरोध झाली”, मुंडे भाऊ-बहिणींचा निवडणुकीत दणदणीत विजय
हेही वाचा…शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या डोक्यात शिजतोय ‘हा’ प्लॅन..! अमोल कोल्हेंसह ‘या’ नेत्याच्या नावाची चर्चा