पुणे : आगामी लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढविणार आहे. त्यानुसार राज्यात आता लोकसभा मतदारसंघासाठी जागावाटपाची चर्चा केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी आणि शिवसेना लोकसभा मतदारसंघ एकमेकांसाठी सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने कंबरही कसली आहे.
हेही वाचा…“सुप्रिया ताई..! हिम्मत असेल तर पीडित तरूणीला भेटा, अन्…!” मंचरला लव्ह जिहादचा प्रकार उघडकीस
राष्ट्रवादी आणि शिवसेना उबाठा गट आगामी लोकसभा निवडणुका एकत्रित लढविणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याम या लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोडण्याची तयारी राष्ट्रवादीने ठेवली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही जागा राष्ट्रवादीने लढवल्या होत्या.
हेही वाचा…भाजपला कंटाळून ‘पंकजा मुंडे’ राष्ट्रवादीत जाणार? राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांनी पंकजा मुंडेंना दिली खास ऑफर
दरम्यान, सध्या ठाणे लोकसभा मतदारसंघातन शिवसेना उबाठा गटाचे राजन विचार, तर कल्याणमधून शिवसेनेचे श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ठाण्यातून राष्ट्रवादीकडून आनंद परांजपे यांनी निवडणुक लढवली होती, तर कल्याण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचेच बाबाजी पाटील यांनी निवडणुक लढविली होती.
READ ALSO :
हेही वाचा…“भाऊ बहिणींसाठी धावला अन् निवडणुक बिनविरोध झाली”, मुंडे भाऊ-बहिणींचा निवडणुकीत दणदणीत विजय
हेही वाचा…शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या डोक्यात शिजतोय ‘हा’ प्लॅन..! अमोल कोल्हेंसह ‘या’ नेत्याच्या नावाची चर्चा
हेही वाचा…उद्धव ठाकरे परदेशात, शरद पवारांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, भेटीचं कारण आलं समोर
हेही वाचा…मावळसाठी राष्ट्रवादीचा मेगा प्लॅन…! पार्थ पवारांना ‘या’ बड्या नेत्याच्या मुलीला राष्ट्रवादी रिपलेस करणार ?
हेही वाचा…राष्ट्रवादी पाठोपाठ काॅंग्रेसही लागली कामाला..! लोकसभा मतदारसंघासाठी हालचाली वाढल्या, अन् उमेदवारांच्या..