पुणे : राज्यात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे या भाऊ बहिणीची जोरदार चर्चा केली जाते. मागच्या विधानसभा निवडणुक भाऊ-बहिणीमध्ये झाल्याने राज्यात एकच चर्चा रंगली होती. यातच आता पुन्हा एकदा भाऊ-बहिणी राजकारणात मैदानात उतरून एकत्रित निवडणुक लढविल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे.
हेही वाचा…भाजपला कंटाळून ‘पंकजा मुंडे’ राष्ट्रवादीत जाणार? राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांनी पंकजा मुंडेंना दिली खास ऑफर
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी स्थापन केलेल्या परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाची निवडणुकीसाठी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्रित आले होते. यानिवडणुकीत धनंजय मुंडे यांनी आपल्याकडून कोणताही उमेदवार न दिल्याने ही निवडणुक बिनविरोध झाली. यामुळे २१ सदस्यांचे संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले.
हेही वाचा…“तानाजी सावंतजी..! नाकाने वांग सोलू नका, हा फक्त ट्रेलर”,अन् सुषमा अंधारे सावतांवर कडाडल्या
वैद्यनात सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाची निवडणुक बिनविरोध झाली आहे. या निवडणुकीसाठी वैद्यनाथ कारखान्याच्या माजी चेअरमन भाजप राष्ट्रीय पंकजा गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे हे दोघे बहिण-भाऊ एकत्र आले. या निवडणुकीसाठी ९ मे रोजी निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला होता. संचालक पदाच्या २१ जागांसाठी एकूण ५० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत ५० पैकी १३ अर्ज नामंजूर झाले होते. तर ३७ अर्ज मंजूर झाले. यातच काल खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह १६ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे २१ जणांचे अर्ज शिल्लक राहिले. त्यामुळे ही निवडणुक बिनविरोध झाली.
READ ALSO :
हेही वाचा…शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या डोक्यात शिजतोय ‘हा’ प्लॅन..! अमोल कोल्हेंसह ‘या’ नेत्याच्या नावाची चर्चा
हेही वाचा…उद्धव ठाकरे परदेशात, शरद पवारांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, भेटीचं कारण आलं समोर
हेही वाचा…मावळसाठी राष्ट्रवादीचा मेगा प्लॅन…! पार्थ पवारांना ‘या’ बड्या नेत्याच्या मुलीला राष्ट्रवादी रिपलेस करणार ?
हेही वाचा…राष्ट्रवादी पाठोपाठ काॅंग्रेसही लागली कामाला..! लोकसभा मतदारसंघासाठी हालचाली वाढल्या, अन् उमेदवारांच्या..
हेही वाचा…“सुप्रिया ताई..! हिम्मत असेल तर पीडित तरूणीला भेटा, अन्…!” मंचरला लव्ह जिहादचा प्रकार उघडकीस