पुणे : देशात मागील काही महिन्यापासून लव्ह जिहादचा विषय चांगलाच चर्चेत आला आहे. यातच आता पुण्यातील मंचर याठिकाणी लव्ह जिहादचा प्रकार घडल्याचा दावा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधत खोचक सवालही केला आहे. या घटनेचे आता व्हिडीओ समोर येत आहेत.
हेही वाचा…कुस्तीपट्टूंच्या आंदोलनाची सरकारने दखल घ्यावी, भाजपच्या ‘या’ खासदाराचा सरकारला घरचा आहेर
मंचर येथील पीडित तरूणीची ओळख तिच्या मैत्रिणीच्या भावाशी झाली आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले. पीडित मुलीच्या घरच्या मंडळींना माहिती मिळाल्यावर आरोपी तरूणाला समज देखील देण्यात आली होती. मात्र त्यानंतर आरोपी मुलाने पीडित मुलीस फुस लावून पळवून उत्तरप्रदेशला घेऊन गेला. त्या घटनेला जवळपास चार वर्षाचा कालावधी लोटला. त्याकाळात पीडित मुलीच्या घरातील मंडळींनी वेळोवेळी पोलिसांकडे दाद मागितली पण योग्य प्रकारे तपास न झाल्याचं गोपीचदं पडळकर यांनी सांगितलं. त्यांनी पीडित मुलीसह तिच्या आईवडिलांसोबत पत्रकार परिषद घेऊन माहिती उघडकिस आणली आहे.
हेही वाचा…बृजभूषण सिंह यांच्याविरोधात कारवाई करण्याची राज ठाकरेंची मोदींकडे मागणी.. थेट पत्रच लिहिलं
दरम्यान, राज्यात लव्ह जिहादच्या घटना घडल्या नाहीत, मला लव्ह जिहाद माहिती नाही, असं म्हणणारे पीडित तरूणीला आणि कुटुंबीयांची भेटून त्यांची भावना जाणून घेणार का ? असा सवाल पडळकर यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना केला आहे. तसेच काही ट्विटवर सुप्रिया ताई. त्या पीडितेला जाऊन भेटा अन् मग हिम्मत असेल तर बोलून दाखवा की लव्ह जिहाद असा काय प्रकारच नसतो ते असं म्हणत सुप्रिया सुळे यांना पीडित तरूणीला भेटण्याचं आवाहन दिलं आहे.
ओ सुप्रिया @supriya_sule ताई , हा 👇 व्हिडिओ बघा, त्या पीडितेला जाऊन भेटा अन् मग हिम्मत असेल तर बोलून दाखवा की “लव्ह जिहाद” असा काय प्रकारच नसतो ते !!
आहे हिम्मत ??pic.twitter.com/GTdBOfNeZP— KhadakSingh🚩 (@khadaksingh_) May 31, 2023
Horrific case of #LoveJihad in Manchar, area of @supriya_sule who bluntly denies such #Jihad!
A Hindu minor girl belonging to Nomadic Tribe was trapped, raped, tortured & forced into prostitution for 4yrs by a Muslim goon.
Appreciate #BJP MLC @GopichandP_MLC who rescued her &… pic.twitter.com/tUCBzogYxd
— Sunil Deodhar (@Sunil_Deodhar) June 1, 2023
READ ALSO :
हेही वाचा…भाजपला कंटाळून ‘पंकजा मुंडे’ राष्ट्रवादीत जाणार? राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांनी पंकजा मुंडेंना दिली खास ऑफर
हेही वाचा…“तानाजी सावंतजी..! नाकाने वांग सोलू नका, हा फक्त ट्रेलर”,अन् सुषमा अंधारे सावतांवर कडाडल्या
हेही वाचा…शिरूर लोकसभा मतदारसंघातून कोल्हेंचा पत्ता कट ? राष्ट्रवादीकडून ‘या’ नावांची चाचपणी
हेही वाचा…वारीसाठी उपयोगी साहित्याचे वाटप अन् संत पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन ; चंद्रकांतदादांच्या उपस्थितीत होणार सोहळा
हेही वाचा…राष्ट्रवादीत चाललंय काय? लोकसभेच्या आढावा बैठकीत ‘या’ नेत्यांनी फिरवली पाठ