मुंबई : गेल्या काही दिवसापासून देशातील कुस्तीपट्टूंनी भाजपचे खासदार आणि भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभुषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलनचा पवित्रा हाती घेतला आहे. कुस्तीपट्टूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यांना या पदावरून बडतर्फ करा, अशी मागणी आता होऊ लागली आहे. त्यावर आता कुस्तीपट्टू आपले मेडल्स गंगेत वाहणार आहेत. या प्रकरणात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष घालण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर भाजपच्या खासदार प्रितम मुंडे यांनी देखील या प्रकरणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा…शिंदेंच्या उपस्थित शिवसेनेत इनकमिंग सुरूच, शिंदे गटात मुंबईतील शिवसैनिक दाखल
कुस्तीपटुंच्या आंदोलनची सरकारने दखल घेतली पाहिजे. जर दखल घेतली जात नसेल तर ही घटना स्वागतार्ह नाही. असं म्हणत खासदार प्रितम मुंडे यांनी रोखठोक भूमिका घेत नरेंद्र मोदी यांच्याकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे. यामुळे प्रितम मुंडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.
हेही वाचा…मध्यरात्री राज ठाकरे-फडणवीसांची भेट…! दुसऱ्याच दिवशी भाजपने मनसेला पाडलं खिंडार, एकच चर्चा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो, ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली असे कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असताना २८ मे ला ज्या पद्धतीने त्यांची जशी फरफट झाली तशी फरफट पुन्हा होऊ नये. तसंच आपण स्वतः ह्या विषयांत लक्ष घालून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि सन्मानजनक तोडगा काढावा व भारतीय क्रीडाजगताला आश्वस्त करावं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…बृजभूषण सिंह यांच्याविरोधात कारवाई करण्याची राज ठाकरेंची मोदींकडे मागणी.. थेट पत्रच लिहिलं
हेही वाचा…“माझ्याविरोधातला एक आरोप जरी सिद्ध झाला, तर त्या दिवशी मी स्वत: फाशी घेईन”, बृजभुषण शरण सिंह
हेही वाचा…“आजपासून अहमदनगरचं नाव….”, एकनाथ शिंदे अन् फडणवीसांनी चौंडीत केली मोठी घोषणा
हेही वाचा…गौतमीच्या यशाने लोकांना… “पाटलां”च्या वादात अमोल कोल्हेंची उडी, टीकाकारांना झापलं
हेही वाचा…रूपाली चाकणकर म्हणताहेत.., “आता विधानसभा लढवायचीय, अजित दादांकडून उमेदवारी मागणार”