नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासून देशातील कुस्तीपट्टूंनी भाजपचे खासदार आणि भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभुषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलनचा पवित्रा हाती घेतला आहे. कुस्तीपट्टूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यांना या पदावरून बडतर्फ करा, अशी मागणी आता होऊ लागली आहे. त्यावर आता बृजभूषण सिंह यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना शिवसेना राष्ट्रवादीत विलीन करण्यासाठी राऊतांना १०० कोटींची ऑफर”, भाजप आमदाराचा मोठा दावा
माझ्यावर आरोप झालेत त्याचा एक तरी पुरावा द्या. मी कुणासोबत चुकीचं वर्तन केलं, कधी केलं ते सांगा. मी आधीही सांगितलं होतं मी आजही सांगतो आहे. माझ्याविरोधातला एक आरोप जरी सिद्ध झाला. तर त्या दिवशी मी स्वत: फाशी घेईन. कुणाला काही सांगायची गरज लागणार नाही. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे. असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीकडून नगर लोकसभा मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी, राष्ट्रवादीतील ‘या’ नेत्यांच्या नावांची चर्चा
पुढे बोलतांना ते म्हणाले की, कुस्तीगीर महिलांचं म्हणणं आहे. मला फाशी झाली पाहिजे. सरकार मला शिक्षा देत नाही. तर आपली मेडल्स घेऊन गंगा नदीत विसर्जन करायला कुस्तीगीर गेले होते. माझ्यावर आरोप करणाऱ्यांना मी तुम्हाला सांगू इच्छितो, गंगेत मेडल्स विसर्जित केल्याने मला फाशी दिली जाणार नाही. तुमच्याकडे कुठलाही पुरावा आहे तर तो पोलिसांना द्या. असंही त्यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आजपासून अहमदनगरचं नाव….”, एकनाथ शिंदे अन् फडणवीसांनी चौंडीत केली मोठी घोषणा
हेही वाचा…गौतमीच्या यशाने लोकांना… “पाटलां”च्या वादात अमोल कोल्हेंची उडी, टीकाकारांना झापलं
हेही वाचा…रूपाली चाकणकर म्हणताहेत.., “आता विधानसभा लढवायचीय, अजित दादांकडून उमेदवारी मागणार”
हेही वाचा…शिंदेंच्या उपस्थित शिवसेनेत इनकमिंग सुरूच, शिंदे गटात मुंबईतील शिवसैनिक दाखल
हेही वाचा…मध्यरात्री राज ठाकरे-फडणवीसांची भेट…! दुसऱ्याच दिवशी भाजपने मनसेला पाडलं खिंडार, एकच चर्चा