नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर महायुतीत शिंदे-फडणवीसांना नवा भिडू मिळाला असल्याची चर्चा रंगू लागली तर दुसरीकडे नागपुरात मनसेला भाजपने खिंडार पाडले. भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मनसेच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेली जात आहे.
हेही वाचा…शिंदे-फडणवीसांच्या महायुती ला ‘नवा भिडू’ मिळणार, महाविकास आघाडी विरूद्ध ताकद वाढवणार
मध्यरात्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीबाबत फडणवीसांना विचारले असता, यावेळी कोणतीही राजकीय चर्चा न झाल्याची प्रतिक्रिया दिली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नागपुरात भाजपकडून मनसेला खिंडार पाडले जात होते. दोन दिवसांपुर्वी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे नागपुर जिल्ह्या अध्यक्ष दिनेश ईलमे, उत्तर नागपुर शाखेचे अध्यक्ष महेश माने यांच्यासह मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांनी राज्यातील डिजिटल पत्रकारांना दिलेला शब्द पाळला..! डिजिटल मिडियाबाबत ऐतिहासिक निर्णय
दरम्यान, आगामी काही काळात राज्यात महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेक नेते, पदाधिकारी पक्ष प्रवेश करतांना दिसत आहेत. यातच महाविकास आघाडी आगामी निवडणुका एकत्रित लढणार असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे शिंदे-फडणवीस यांच्यासह महायुतीचीही चर्चा आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना शिवसेना राष्ट्रवादीत विलीन करण्यासाठी राऊतांना १०० कोटींची ऑफर”, भाजप आमदाराचा मोठा दावा
हेही वाचा…राष्ट्रवादीकडून नगर लोकसभा मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी, राष्ट्रवादीतील ‘या’ नेत्यांच्या नावांची चर्चा
हेही वाचा…संजय शिरसाट यांना ‘त्या’ प्रकरणात क्लिनचीट, अहवाल प्राप्त झाला नसल्याची महिला आयोगाची प्रतिक्रिया
हेही वाचा…“शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांना पुढच्या निवडणुका भाजपच्या चिन्हावर लढावे लागणार”
हेही वाचा…हसन मुश्रीफ, प्रतीक पटेल लोकसभा निवडणुक लढणार, राष्ट्रवादीत चर्चा, भाजपला धक्कातंत्र देण्याच्या तयारीत