मुंबई : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाने कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आपपली तयारी सुरू केली आहे. यातच आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यात आला. यातच आता कोल्हापुर लोकसभा निवडणुकीसाठी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…भाजपच्या २८ वर्षाच्या बाल्लेकिल्याला सुरूंग लावणारा आमदार म्हणतोय, “मी अजून छोटा कार्यकर्ता”, पटोलेंची ‘ती’ ऑफर धुडकावली
कोल्हापुर, हातकणंगलेच्या जागांसाठी ठाकरे गटानंतर आता राष्ट्रवादीही आग्रही झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. लोकसभेच्या दोन्ही जागा संदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत काल सांयकाळी बैठक पार पडली. राष्ट्रवादीकडून आमदार हसन मुश्रीफ यांनाच कोल्हापुरातून लोकसभेसाठी उतरवण्याच्या हालचाली तर हातकणंगले जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील आणि कर्णसिंह गायकवाड यांच्या नावावर चर्चा रंगल्या आहेत.
हेही वाचा…“२४ तासांत वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा..”, आमदाराने महावितरण अधिकाऱ्यांना झाप-झाप झापलं
गेल्या तीन लोकसभा निवडणुकीत उसना उमेदवार दिल्यानेच पक्षाचं नुकसान झाल्याचा बैठकीत सुर यावेळी बघायला मिळाला. पक्षात काम केलेल्या उमेदवारांना संधी मिळण्याची यावेळी मोठी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर अलिकडच्या महिन्यात हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड पडली होती. ईडीने हसन मुश्रीफ यांना समन्स बजावून त्यांची तब्बल ९ तास चौकशी केली होती.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदे-फडणवीसांच्या महायुती ला ‘नवा भिडू’ मिळणार, महाविकास आघाडी विरूद्ध ताकद वाढवणार
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांनी राज्यातील डिजिटल पत्रकारांना दिलेला शब्द पाळला..! डिजिटल मिडियाबाबत ऐतिहासिक निर्णय
हेही वाचा…लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीने ठेवले ‘या’ मतदारसंघावर लक्ष, शरद पवारांनी दिले महत्वाचे आदेश
हेही वाचा…निळूफुलेंची मुलगी गार्गी फुले म्हणतेय, की “राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये मला तिकीट दिलं तर..”,
हेही वाचा…“महाराष्ट्रात कर्नाटक नाही तर फक्त ‘उद्धव ठाकरें’चाच फॉर्म्युला दिसणार”, ठाकरेंचे सैनिक मैदानात