मुंबई : राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते पक्षांतर्गत प्रवेश करतांना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बडानंतर अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इतर नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडली. यातच आता राष्ट्रवादीत देखील पक्षप्रवेश होतांना दिसत आहेत. ज्येष्ठ सिने अभिनेते स्वर्गीय निळुभाऊ फुले यांची कन्या अभिनेत्री गार्गी फुले हिने आज राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी नृत्य दिग्दर्शक अशुतोष राठोड, निर्माते नितीन नितीन पवार यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
हेही वाचा…निळुफुलेंची मुलगी अभिनेत्री गार्गी फुले राष्ट्रवादीत, प्रवेश करताच राष्ट्रवादीने दिली ‘ही’ जबाबदारी
गार्गी फुले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना पक्षात राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक सेलच्या प्रदेश उपाध्यक्ष, तर आशुषोत राठोड यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व नितीन पवार यांची पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
हेही वाचा…“..तर छगन भुजबळांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा,” प्रकाश आंबेडकर आक्रमक
यातच गार्गी फुले म्हणाल्या की, खुप दिवसांपासून मी अजितदादांची वेळ मागितली होती. मला राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची ऑफर होती तेव्हा मी लगेच हो म्हणाले. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासोबत आमच्या कुटुंबाचे चांगले संबंध आहे. राजकारणात तरूणपिढी येत नाही. असं बोलतात. पण प्रवाहात काम करायचे असेल तर उतरून काम करावे लागेल.
हेही वाचा…शिंदे गटातील ते १३ खासदार ही अपात्र होणार, सेनेच्या खासदाराचा मोठा दावा
माझ्यावर पक्ष कुठलीही जबाबदारी दिली तरी मी योग्यरित्या पाळेन. राजकारणात तरूणांनी यायला हवे. देशाचा आणि राज्याचा विकास करायचा असेल तर राजकारणात येऊन काम करायला हवं. तसेच पक्षाने तिकीट देऊन निवडणुक लढविण्यास सांगितले तर नक्कीच मी निवडणुक लढवेन असंही त्या म्हणाल्या.
READ ALSO :
हेही वाचा…“महाराष्ट्रात कर्नाटक नाही तर फक्त ‘उद्धव ठाकरें’चाच फॉर्म्युला दिसणार”, ठाकरेंचे सैनिक मैदानात
हेही वाचा…भाजपच्या २८ वर्षाच्या बाल्लेकिल्याला सुरूंग लावणारा आमदार म्हणतोय, “मी अजून छोटा कार्यकर्ता”, पटोलेंची ‘ती’ ऑफर धुडकावली
हेही वाचा…“२४ तासांत वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा..”, आमदाराने महावितरण अधिकाऱ्यांना झाप-झाप झापलं
हेही वाचा…“केवळ एक रूपयात पीक विमा..!” शिंदे सरकारची नवी योजना, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
हेही वाचा…अंबादास दानवेंचं विधान परिषदेतील ‘विरोधी पक्षनेते’ पद जाणार, शिंदे गट अॅक्शन मोडवर