मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये केवळ एक रूपयात शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. यामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचसोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजना देखील राज्यात राबविणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“चंद्रपुरचा कायापालट करण्याची धानोरकरांची भूमिका, मात्र नियतीच्या पुढे..”, अजित पवारांनी व्यक्त केलं दु:ख
आज मंत्रालयात पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कामगारांची सुरक्षा, आरोग्य, कामाच्या स्थितीबाबत नवीन कामगार नियमांना मान्यता देण्यात आली आहे. यामुळे लाखो कामगारांचे हित राज्य सरकारकडून जपले जाणार आहे. त्याचबरोबर डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेस मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेत आणखी तीन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा…ठाकरे गट पुन्हा फुटणार ? फडणवीसांचा मोठा दावा, अनेक जण संपर्कात
सिल्लोड तालुक्यात मका संशोधन केंद्र स्थापन करण्यात येणार असून यासाठी २२.१७ कोटी रूपयांना मान्यता देण्यात आली आहे. महिलांना पर्यटन व्यवसायात अधिक वाव देण्यासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण राबविण्यात येणार असून त्याचबरोबर राज्याला माहिती तंत्रज्ञानात देशात आघाडीवर नेणाऱ्या नवीन माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणास मान्यता देण्यात आली आहे. तसेच ९५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार आहे.
हेही वाचा…पाच वर्षात महाराष्ट्राने गमावले 6आमदार तर ३ खासदार, जाण्याची वयं चिंतेत टाकणारी, वाचा संपुर्ण यादी..
कापूस उत्पादक क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी नव्या वस्त्रोद्योग धोरणास मान्यता दिली आहे. तसेच यामधून २५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार आहे. सहकारी संस्थांचे कामकाज परिणामकारक व्हावे म्हणून क्रियाशील सदस्यांची व्याख्या स्पष्ट. अधिनियमात सुधारणा करणार. बृहन्मुंबईमध्ये समूह पुनर्विकासास मोठे प्रोत्साहन मिळणार. अधिमूल्यात ५० टक्के सवलतीचा निर्णय. अभियांत्रिकी, औषधनिर्माण महाविद्यालयांत प्राध्यापकांची १०५ पदांची निर्मिती करणार. नांदुरा येथील जिगाव प्रकल्पाला गती देणार. अतिरिक्त १७१० कोटीच्या खर्चास मान्यता.
READ ALSO :
हेही वाचा…अंबादास दानवेंचं विधान परिषदेतील ‘विरोधी पक्षनेते’ पद जाणार, शिंदे गट अॅक्शन मोडवर
हेही वाचा…निळुफुलेंची मुलगी अभिनेत्री गार्गी फुले राष्ट्रवादीत, प्रवेश करताच राष्ट्रवादीने दिली ‘ही’ जबाबदारी
हेही वाचा…“..तर छगन भुजबळांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा,” प्रकाश आंबेडकर आक्रमक
हेही वाचा…शिंदे गटातील ते १३ खासदार ही अपात्र होणार, सेनेच्या खासदाराचा मोठा दावा
हेही वाचा…“आघाडीसह आता शिंदे-फडणवीसांच्या ‘महायुती’ तही जागा वाटपावरून हमरीतुमरी, एक पक्ष आक्रमक