पुणे : चंद्रपुरचे काॅंग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं वयाच्या ४७ वर्षी निधन झालं. यानंतर राज्यातील पुन्हा एकदा तरूण खासदार गमावला असल्याची प्रतिक्रिया राज्यातील राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येत आहे. यातच २०१९ नंतर महाराष्ट्राने ६ आमदार तर ३ खासदारांचं सरासरी ५५ ते ६० वयाच्या निधन झाल्याने राज्यात आता चिंता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा…“कर्नाटकप्रमाणे मध्यप्रदेशात काॅंग्रेस १५० जागा जिंकणार,” राहुल गांधींचा विश्वास
पंढरपुर-मंगळवेडा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे वयाच्या ६० व्या वर्षी २८ नोव्हेंबर २०२० रोजी निधन झालं होतं. ते सलग तीनवेळा विधानसभा आमदार होते. त्यांना ३० ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. पुण्यात रूबी हॉलमध्ये त्यांचं निधन झालं होतं.
हेही वाचा…ग्राऊंड रिपोर्ट: वाढदिनी विलास लांडे यांनी फुंकले शिरुर लोकसभेचे रणशिंग! दिल्लीत धडकणार आता ‘स्वयंभू स्वावलंबी अन् स्वाभिमानी नेता’
त्यानंतर नांदेडमधील देगलूर-बिलोरी विधानसबा मतदारसंघातील काॅंग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचंही कोरोनाने वयाच्या ५५ वर्षी निधन झालं. त्यानंतर कसबा पेठ मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचं वयाच्या ५७ व्या वर्षी तर पिंपरी चिंचवडचे भाजपचेच आमदार लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजाराने वयाच्या ६० व्या वर्षी निधन झालं होतं.
हेही वाचा…“सोमय्यांना नाक घासून माफी मागावी लागेल, नाहीतर १०० कोटी द्यावे लागेल”, परबांना ‘त्या’ प्रकरणात मोठा दिलासा
दरम्यान, तर २०२१ मध्ये काॅंग्रेसचे राज्यसभा खासदार आणि राष्ट्रीय राजकारणातील पक्षाचे अभ्यासू नेते अॅड राजीव सातव यांचंही पुण्यात ४६ व्या वर्षी निधन झालं. त्यानंतर पुणे लोकसभेचे खासदार गिरीश बापट यांचंही वयाच्या ७३ व्या वर्षी पुण्यात दिर्घ आजाराने निधन झालं. त्यानंतर आता चंद्रपुरचे काॅंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच वयाच्या ४७ व्या वर्षी निधन झालं आहे.
२०१९ नंतर निधन झालेल्या आमदार आणि खासदारांची यादी..
आमदार
1 भारत भालके- 60
2 रावसाहेब अंतापुरकर- 63
3 चंद्रकांत जाधव- 57
4 रमेश लटके- 52
5 मुक्ता टिळक- 57
6 लक्ष्मण जगताप- 60
खासदार
1.राजीव सातव – 47
2.गिरीश बापट – 73
3.बाळू धानोरकर – 47
READ ALSO :
हेही वाचा…पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी ‘काॅंग्रेस’चा उमेदवार ठरला..! पटोलेंनी ‘नाव’ही जाहीर केलं
हेही वाचा…“मिंधे गटाच्या ४० कोंबड्या व १३ तुर्रेबाज कोंबडे भाजपच्या खुराड्यात”, ठाकरे गटाची जहरी टिका
हेही वाचा…महाराष्ट्राने युवा खासदार गमावला..। काॅंग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं निधनं
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना सावरकरांच्या जयंतीचा विसर, भाजपने दोन फोटो ट्विट करत साधला निशाणा”
हेही वाचा…गौतमी पाटीलच्याबाबत संभाजी राजेंनी भूमिका बदलली, म्हणाले की, “अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण.!”