पुणे : गेल्या काही दिवसापासून गौतमी पाटील हिच्या आडनावावरून अनेक वाद उफाळून आला. गौतमी पाटील हिचं आडनाव पाटील नसून चाबुस्ककर आहे. तिने यापुढे पाटील आडनाव लावू नये. असा इशारा तिला देण्यात आला. त्यानंतर तिच्या समर्थनार्थ अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. यातच माजी खासदार संभाजी राजे यांनी देखील पाठिंबा दर्शविला होता. परंतु अशा कलेला नको रे बाबा सरंक्षण म्हणत संभाजी राजे यांनी पलटी मारली.
हेही वाचा…आघाडीत बिघाडी..? लोकसभेच्या सर्व जागांची काॅंग्रेसकडून चाचपणी, काॅंग्रेस निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत
काल पत्रकारांशी संवाद साधताना संभाजी राजे म्हणाले की, महिलांनी आपले गुण आणि कर्तृत्व सर्वांना दाखविले आहे. सात वर्ष ताराराणीने औरंगजेबाशी लढा दिला. तेव्हापासून महिला सबलीकरण सुरू झाले आहे आणि शिवाजी महाराजांनी महिलांना संरक्षण दिला आहे. कलाकरांना संरक्षण मिळाले पाहिजे या मताच मी आहे. असं संभाजी राजे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यासमोरच पुतळे हटवले जातात हे चिंतेची बाब”, जयंत पाटलांची टिका
त्यानंतर आज त्यांनी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, “काल एका पत्रकाराने एका महिलेचा “कलाकार” असा उल्लेख करत, तिला त्रास व धमक्या दिल्या जात आहेत म्हणत मला प्रतिक्रिया विचारली. मला त्या व्यक्तीची व तिच्या कलेची काहीही माहिती नव्हती. पण महिला कलाकाराला धमक्या येणे हे चुकीचे समजून मी बोलून गेलो की कलाकारांना संरक्षण दिले पाहिजे. मात्र आज त्याचे नकारात्मक पडसाद उमटल्यावर आश्चर्याने या कलाकाराची “कला” मी बघितली. आता असे वाटत आहे, महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण !”
काल एका पत्रकाराने एका महिलेचा “कलाकार” असा उल्लेख करत, तिला त्रास व धमक्या दिल्या जात आहेत म्हणत मला प्रतिक्रिया विचारली. मला त्या व्यक्तीची व तिच्या कलेची काहीही माहिती नव्हती. पण महिला कलाकाराला धमक्या येणे हे चुकीचे समजून मी बोलून गेलो की कलाकारांना संरक्षण दिले पाहिजे.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 29, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“कर्नाटकप्रमाणे मध्यप्रदेशात काॅंग्रेस १५० जागा जिंकणार,” राहुल गांधींचा विश्वास
हेही वाचा…ग्राऊंड रिपोर्ट: वाढदिनी विलास लांडे यांनी फुंकले शिरुर लोकसभेचे रणशिंग! दिल्लीत धडकणार आता ‘स्वयंभू स्वावलंबी अन् स्वाभिमानी नेता’
हेही वाचा…“सोमय्यांना नाक घासून माफी मागावी लागेल, नाहीतर १०० कोटी द्यावे लागेल”, परबांना ‘त्या’ प्रकरणात मोठा दिलासा
हेही वाचा…मोठी बातमी..! काॅंग्रेसचा एकमेव खासदार व्हेटिंलेटरवर, रूग्णालयातून आली मोठी अपडेट
हेही वाचा…नवनीत राणांसाठी कठीण परिक्षा..! राष्ट्रवादी, प्रहारनंतर आता अमरावतीच्या जागेवर काॅंग्रेसचा दावा